कर्नाटकात तीन ठिकाणी बाजीप्रभु देशपांडे बलीदानदिन साजरा
बेंगळूरू : छत्रपती शिवाजी महाराजांच्या हिंदवी स्वराज्याच्या स्थापनेत बाजीप्रभु देशपांडे यांची मोलाची भूमिका होती. हे लक्षात घेऊन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने त्यांचा बलीदानदिन नुकताच शिवठाण (जिल्हा बेळगाव), विवेक मंदिर (बेंगळूरू) आणि काळगी (जिल्हा विजयपूर) या ठिकाणी साजरा करण्यात आला. यानिमित्त समितीचे अनुक्रमे श्री. पुंडलिक अलोलकर, सौ. भव्या गौडा आणि श्री. प्रतीक पिरापूर यांनी धर्मप्रेमींमध्ये शौर्याचे जागरण केले. या वेळी बाजीप्रभु देशपांडे यांची स्वामीनिष्ठा, तसेच हिंदवी स्वराज्यासाठी त्यांनी केलेल्या त्यागाविषयी माहिती देण्यात आली. या कार्यक्रमांचा १७५ हून अधिक धर्मप्रेमींनी लाभ घेतला. कार्यक्रमांच्या शेवटी हिंदु राष्ट्रासाठी प्रतिज्ञा करण्यात आली.
हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शक गुरु लाभले ! – धर्मप्रेमी, काळगी (जिल्हा विजयपूर)
कार्यक्रम संपल्यावर काळगी येथील धर्मप्रेमी म्हणाले, ‘‘आम्ही आमच्या गावात हिंदु धर्माचे अनेक कार्यक्रम केले; परंतु त्यासाठी स्पष्ट असे ध्येय आणि मार्गदर्शक गुरु नव्हते. आता हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आम्हाला मार्गदर्शक गुरु आणि हिंदु राष्ट्राचे ध्येयही लाभले आहे. त्यामुळे आम्ही धर्मकार्यात अधिक जोमाने आणि उत्साहाने सहभागी होऊ.’’