‘लाल कप्तान’ या हिंदुविरोधी चित्रपटाला धर्माभिमान्यांचा तीव्र विरोध
विशाखापट्टनम् (आंध्रप्रदेश) : आगामी चित्रपट ‘लाल कप्तान’मध्ये नागा साधूंचे अश्लाघ्य विडंबन करण्यात आले आहे. हिंदु धर्मरक्षणासाठी महान कार्य करणार्या नागा साधूंना या चित्रपटाच्या माध्यमातून अपकीर्त करण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे. त्यामुळे हा चित्रपट प्रदर्शित होऊ नये, या मागणीसह ‘गोरक्षकांवर होणारी आक्रमणे थांबवावी आणि संपूर्ण देशात गोहत्या बंदी कायदा लागू करावा’, या मागण्यांसाठी हिंदु जनजागृती समिती आणि समविचारी संघटना यांच्या वतीने आंध्रप्रदेशमध्ये विशाखापट्टनम् येथील महानगरपलिकेसमोर आणि इंदूर (निझामाबाद) येथील जिल्हाधिकारी कार्यालयासमोर राष्ट्रीय हिंदू आंदोलन करण्यात आले.
विशाखापट्टनम् येथील आंदोलनामध्ये श्री लोकेश्वरानंद स्वामी यांच्यासमवेत विश्व हिंदु परिषद, शिवा शक्ती, श्रीराम सेना, सनातन संस्था यांच्यासह अन्य धर्माभिमानी उपस्थित होते, तर इंदूर येथील आंदोलनातही ५ संघटनांनी सहभाग घेतला. इंदूर येथे पाऊस असतांनाही हिंदुत्वनिष्ठ छत्र्या घेऊन आंदोलनामध्ये उपस्थित राहिले.
विशाखापट्टनम् आंदोलनातील क्षणचित्र
आंदोलनापूर्वी पाऊस पडत होता. आंदोलनाच्या वेळी २ घंटे पाऊस संपूर्ण थांबला होता. त्यानंतर पुन्हा चालू झाला.