बेंगळूरू : येथे ‘राज्य वक्कलिग वक्कूट ट्रस्ट’च्या वतीने येथील रवींद्र कलाक्षेत्र येथे झालेल्या एका भव्य कार्यक्रमात हिंदु जनजागृती समितीचे कर्नाटक राज्य प्रवक्ते श्री. मोहन गौडा यांचा सत्कार करण्यात आला. या कार्यक्रमात देशातील विविध मान्यवरांसमवेत यशप्राप्त विद्यार्थ्यांचाही सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी स्वटिकपुरी महासंस्थानाचे नंजावधूत महास्वामीजी, केंद्रीय रासायनिक खतमंत्री डी.व्ही. सदानंद गौडा, बेंगळूरूच्या महापौर सौ. गंगांबिका मल्लिकार्जुन, राज्य वक्कलिग वक्कूट ट्रस्टचे अध्यक्ष श्री. सी.व्ही. देवराज यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते.