- इम्रान खान यांनी कितीही वेळा अशी विधाने केली, तर वस्तूस्थिती वेगळीच रहाणार, हेच सत्य आहे !
- जगाचा इतिहास क्रूर इस्लामी आक्रमकांकडून धर्माच्या आधारे केलेल्या अत्याचारांनी बरबटलेला असतांना, तसेच भारतात गल्ली-बोळात लव्ह जिहादसारखे प्रकार प्रतिदिन घडत असतांना खान यांचे हे विधान म्हणजे ‘सौ चुहे खाके बिल्ली चली हाज को’, या स्वरूपाचे आहे !
इस्लामाबाद : महंमद पैगंबर यांनी अल्पसंख्याकांना धार्मिक स्वातंत्र्य दिले होते. त्यांनी त्यांच्या प्रार्थनास्थळांना संरक्षणही दिले होते. असे असतांना आम्ही इतरांचे धर्मांतर कसे करू शकतो ? मग ते मुसलमानेतर मुलींशी विवाह करून असो कि बंदुकीच्या धाकाद्वारे असो किंवा कोणाला ठार करण्याची धमकी देऊ असो. या सर्व गोष्टी इस्लामविरोधी आहेत. इस्लामच्या इतिहासामध्ये दुसर्यांचे धर्मांतर करण्याचे उदाहरण नाही, असे प्रतिपादन पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केलेे. ते राष्ट्रीय अल्पसंख्याक दिवसानिमित्तच्या एका कार्यक्रमात बोलत होते. (काश्मिरी हिंदूंना तेथील जिहादी आतंकवाद्यांनी ‘इस्लाम स्वीकारा’, ‘काश्मीर सोडून जा’ किंवा ‘मरणाला सिद्ध व्हा’, या दिलेल्या धमक्यांविषयी इम्रान खान तोंड का उघडत नाहीत ? हे इस्लामला मान्य आहे का, ते खान का सांगत नाहीत ? – संपादक)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात