Menu Close

मुझफ्फरपूर (बिहार) येथे मशिदीजवळ महिला कावड यात्रेकरूंवर धर्मांधांकडून दगडफेक

  • देशात असहिष्णुता वाढल्यावरून पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिणारे पुरो(अधो)गामी लेखक, अभिनेते अशा घटनांच्या वेळी कुठे असतात ? कि धर्मांधांकडून होणारा हिंसाचार हा सहिष्णुतेचाच एक प्रकार आहे, असे त्यांना वाटते ?
  • देशातील धर्मांधांच्या प्रार्थनास्थळांजवळील परिसरही आता दुसरे काश्मीर ठरत आहे, असे या घटनांवरून कुणी म्हटल्यास चुकीचे ठरू नये !
  • हिंदू हे धर्मांधांसाठी मंदिरात ‘इफ्तार पार्ट्या’ आयोजित करतात, तर धर्मांध हिंदूंच्या यात्रांवर आक्रमणे करतात ! हिंदू आता तरी जागे होतील का ?

मुझफ्फरपूर (बिहार) : येथील बरूराज भागातील मशिदीजवळून महिला कावड यात्रेकरू जात असतांना धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. काही यात्रेकरूंना वाटेत रोखण्यात आल्याचेही वृत्त आहे. या घटनांमुळे येथे तणावाची स्थिती निर्माण झाली असून पोलिसांनी मोठ्या प्रमाणात बंदोबस्त ठेवला आहे. दगडफेकीनंतर धर्मांधांकडून पोलिसांनाही धक्काबुक्की करण्यात आली. कावड यात्रेकरू नदीतून पाणी घेऊन येतांना त्यांना मशिदीजवळील मार्गाऐवजी अन्य मार्गाने जाण्यास सांगण्यात येत आहे. दोन दिवसांपूर्वी याच भागात काही जणांना मारहाणही करण्यात आली होती.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *