- मुसलमान व्यक्तीने हलाल नसणारे जेवण मिळाल्याची तक्रार केल्यावर त्याची नोंद घेणारे झोमॅटो आस्थापन हिंदूंना मात्र धर्मनिरपेक्षता शिकवतेे !
- अशा आस्थापनांकडून अन्नपदार्थांची मागणी करण्याचे धर्माभिमानी हिंदूंनी बंद केल्यास आश्चर्य वाटू नये !
नवी देहली : ‘झोमॅटो’ या अन्नपदार्थ घरपोच आणून देणार्या आस्थापनाकडे पंडित अमित शुक्ला या हिंदु ग्राहकाने अन्नपदार्थाची मागणी केली होती. ते घेऊन येणारा कर्मचारी मुसलमान असल्याच्या कारणाने, तसेच उत्तर भारतात सध्या श्रावण चालू असल्याने ‘हिंदु कर्मचार्याच्या माध्यमातून अन्नपदार्थ पाठवावे’, अशी मागणी ‘झोमॅटो’कडे केली; मात्र ‘झोमॅटो’ने ही मागणी फेटाळून लावली. यावर शुक्ला यांनीही त्यांची मागणी रहित केली. ‘झोमॅटो’ने शुक्ला यांना त्यांचे पैसे परत देण्यास नकार दिला. तसेच ‘झोमॅटो’ने, ‘अन्नाला धर्म नसतो, अन्न हाच धर्म असतो’, असे ‘ट्वीट’ केले. (हे तत्त्वतः योग्य असले, तरी ग्राहकाची इच्छा असल्यास आस्थापनाने ते मान्य करावे अन्यथा ग्राहकाचे पैसे करत करावेत, हे नैतिकदृष्ट्या योग्य ठरते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यावरून शुक्ला यांच्यावर ते धार्मिक भेदभाव केल्याची टीका होत आहे, तर शुक्ला यांनी मात्र ‘हे माझे व्यक्तीस्वातंत्र्य आहे’, असे स्पष्ट केले आहे.
Food doesn’t have a religion. It is a religion. https://t.co/H8P5FlAw6y
— Zomato India (@ZomatoIN) July 31, 2019
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात