Menu Close

धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली लव्ह जिहादला बळी पडत आहेत : डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे

शिरोली (जिल्हा कोल्हापूर) : हिंदु महिला-युवती यांनी महान हिंदु संस्कृतीचा त्याग करून पाश्‍चिमात्य संस्कृतीला जवळ केलेे, तसेच महिलांना मिळालेल्या स्वातंत्र्याचे स्वैराचारात रूपांतर झाले आहे. यामुळे हिंदूंच्या घरांपर्यंत ‘लव्ह जिहाद’ नावाचे संकट येऊन पोचले आहे. धर्मशिक्षणाच्या अभावामुळे हिंदु मुली ‘लव्ह जिहाद’ला बळी पडत आहेत, असे प्रतिपादन सनातन संस्थेच्या आधुनिक वैद्या (सौ.) शिल्पा कोठावळे यांनी केले. त्या २८ जुलै या दिवशी शिरोली येथील म्हसोबा मंदिरात ‘हिंदु संस्कृतीचे महत्त्व आणि लव्ह जिहादचा वाढता धोका’, या विषयावर मार्गदर्शन करतांना त्या बोलत होत्या. याचा लाभ ६५ युवती आणि महिला यांनी घेतला. याच विषयावर माळभाग येथेही मार्गदर्शन झाले. माळभाग येथे सामाजिक कार्यकर्त्या सौ. अश्‍विनी आगळे या उपस्थित होत्या. त्याचा लाभ २५ युवतींनी घेतला. याचे आयोजन बजरंग दलाचे श्री. प्रशांत कागले यांनी केले होते.

डॉ. (सौ.) शिल्पा कोठावळे पुढे म्हणाल्या, ‘‘दिवसेंदिवस महिलांवरील अत्याचारांची संख्या वाढत आहे. प्रतिदिन कुठेना कुठे अत्याचाराची वृत्ते येतच आहेत. एकूच देशातील महिलांचे जीवन असुरक्षित झाले आहे. हिंदु महिला, युवती यांना खोट्या, फसव्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवण्याचा जो प्रकार चालू आहे, तो म्हणजे ‘लव्ह जिहाद’ होय. या जिहादला अगदी उच्चशिक्षित, तसेच विवाहित महिलाही बळी पडत आहेत. अशा मुलींचे आयुष्य पुढे उद्ध्वस्त होते. असे न होण्यासाठी हिंदु मुलींना लहानपणापासून हिंदु धर्माच्या संस्कारांचे बाळकडू दिले पाहिजे. आपल्या धर्मातील तेजस्वी विरांगनांचा इतिहास त्यांना सांगितला पाहिजे.’’

विशेष

१. दोन्ही ठिकाणांचे मार्गदर्शन महिला, युवती यांना आवडले आणि धर्मशिक्षणाची उपयुक्त माहिती मिळाली, असे सांगितले. सदरचे मार्गदर्शन ऐकून दोन धर्मशिक्षणवर्गांची मागणी करण्यात आली आहे.

२. माळभाग येथील मार्गदर्शन ऐकून सौ. अश्‍विनी आगळे या पुष्कळ प्रभावित झाल्या. त्यांनी ही माहिती मुलींसाठी पुष्कळच उपयुक्त होती, तसेच यापुढील काळात मुले आणि मुली अशा दोघांसाठीही कार्यक्रमाचे आयोजन करू, असे त्यांनी सांगितले.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *