Menu Close

यवतमाळ येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने जिल्हाधिकार्‍यांना निवेदन !

यवतमाळ : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या आदेशानुसार, तसेच राज्य शासनाच्या प्लास्टिक बंदीच्या निर्णयानुसार कारवाई करावी, या मागणीचे निवेदन २९ जुलैला हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये देण्यात आले. जिल्हाधिकारी कार्यालयाचे अधीक्षक श्री. मांडेकर यांनी हे निवेदन स्वीकारले. ‘राष्ट्रध्वजाची विटंबना थांबवण्यासाठी शासकीय स्तरावर आम्ही प्रयत्न करू’, असे आश्‍वासन त्यांनी या वेळी समितीच्या कार्यकर्त्यांना दिले. निवेदन देतांना श्रीराम जन्मोत्सव समितीचे श्री. मनोज औदार्य, सामाजिक कार्यकर्ते श्री. मिलिंद ठोसर, तसेच हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्थेचे कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *