भगतसिंह, राजगुरु आणि सुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त कार्यक्रम
हरियाणा : अखिल भारतीय हिंदू युवा मोर्चा संघटनेच्या वतीने भगतसिंह, राजगुरु, सुखदेव यांच्या बलीदानदिनानिमित्त गन्नौर (हरियाणा) येथे आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात क्रांतीकारकांना भावपूर्ण श्रद्धांजली वहाण्यात आली. या संघटनेचे प्रदेशाध्यक्ष हिंदुवीर सचिन त्यागी यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून हिंदु जनजागृती समितीचे श्री. विनय पानवळकर यांना निमंत्रित करण्यात आले होते.
उपस्थितांना संबोधित करतांना समितीचे श्री. विनय पानवळकर म्हणाले की,
१. भारताच्या सद्यःस्थितीकडे पाहून ज्या स्वराज्यासाठी अनेक क्रांतीकारक हसतमुखाने फाशी गेले, ते बलीदान व्यर्थ ठरत आहे का ? अशी शंका येते.
२. आतापर्यंत राष्ट्र आणि धर्म यांच्या रक्षणासाठी बलीदान करणार्यांचा इतिहास आपल्याला शिकवण्यात आला; परंतु हिंदु जनजागृती समितीच्या माध्यमातून आता अधर्मियांना वैध मार्गाने धडा शिकवण्याचा इतिहास निर्माण करायचा आहे.
३. इतिहासामध्ये संघर्ष करून बलीदान करूनही आपला पराभव का झाला, याचा अभ्यास केल्यास येणार्या आपत्काळामध्ये आपल्याला विजयी होता येईल. आपत्काळात विजयी होण्यासाठी धर्मबळ अत्यंत आवश्यक आहे. छत्रपती शिवाजी महाराजांनी धर्माच्या बळावर हिंदूंसाठी सार्वभौम अशा हिंदवी स्वराज्याची स्थापना केली.
४. हिंदु राष्ट्र निर्माण करण्यासाठी आपल्याला धार्मिक कृतींमागील शास्त्र समजून घेऊन धर्माचरण करणे आवश्यक आहे. असा भारत निर्माण होण्यासाठी सातत्याने प्रयत्नरत रहाणे, हीच क्रांतीकारकांना खरी श्रद्धांजली ठरेल.
कार्यक्रमात अनेक वक्त्यांनी क्रांतीकारकांचा अवमान करणार्या काँग्रेसचा तीव्र निषेध केला. भारतमातेचा अवमान करणार्यांना धडा शिकवण्यात येईल, अशी चेतावणी भारतमाता की जय म्हणण्याच्या विरोधात असलेल्या ओवैसी बंधूंना देण्यात आली, तसेच अखंड भारत निर्माण करण्याची प्रतिज्ञाही करण्यात आली.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात