महर्षींनी सांगितल्यानुसार परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या अवतारी कार्याला अधिकाधिक प्रसिद्धी प्राप्त होत असल्याची प्रचीती !
फाल्गुन कृष्ण पक्ष तृतीयेला (२६.३.२०१६ या दिवशी) छत्रपती शिवाजी महाराजांची तिथीनुसार जयंती होती. त्या निमित्ताने विविध ठिकाणी हिंदु जनजागृती समितीच्या वक्त्यांना व्याख्यानासाठी आमंत्रित करण्यात आले होते. महाराष्ट्र आणि गोवा, तसेच देहली येथे एकूण ३६ ठिकाणी समितीच्या वक्त्यांनी छत्रपती शिवाजी महाराजांनी स्थापलेले हिंदवी स्वराज्य अन् हिंदु राष्ट्र स्थापनेची आवश्यकता या विषयावर उपस्थितांना संबोधित केले.
समितीच्या कार्याला मिळणारा हा उदंड प्रतिसाद म्हणजे आपल्याला समितीच्या माध्यमातून हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी कार्य करण्याची योग्य दिशा मिळणार, असा विश्वास ठिकठिकाणच्या हिंदुत्ववाद्यांमध्ये निर्माण झाल्याचे द्योतक आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात