Menu Close

गोरक्षकांवर हल्ले करणाऱ्या धर्मांधांवर कठोर कारवाई करा : नागपूर येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे मागणी

नागपूर : महाराष्ट्र शासनाने गोवंश हत्याबंदीचा कायदा केल्याने गोवंश हत्या आणि गोतस्करी बंद होईल, अशी अपेक्षा होती; मात्र प्रत्यक्षात तसे झालेले दिसत नाही. याउलट गोरक्षकांवर आक्रमणे वाढत आहेत. बदलापूर, ठाणे येथील गोरक्षक श्री. चेतन शर्मा २४ जूनला पोलिसांसह अवैध पशूवधगृहाच्या विरोधात कारवाई करण्यासाठी गेले असता त्यांच्यावर ३५० हून अधिक धर्मांध कसायांच्या जमावाने प्राणघातक आक्रमण केले, तसेच अन्य गोरक्षकांच्या संदर्भात होत आहे. देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, अशी मागणी श्री. विद्याधर जोशी यांनी येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनामध्ये केली. २७ जुलै या दिवशी ही मागणी करण्यात आली. यासमवेत अन्यही राष्ट्र आणि धर्म विषयक मागण्या या आंदोलनात करण्यात आल्या.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *