निपाणी (जि. बेळगाव) : देशभरातील अवैध पशूवधगृहे तात्काळ बंद करण्यासाठी शासनाने कठोर पावले उचलावीत, गोरक्षकांवर आक्रमणे करणार्या धर्मांधांवर कठोर कारवाई करावी, तसेच देशभरात गोवंश हत्याबंदी कायदा तात्काळ लागू करून त्याची कठोर कार्यवाही करण्यात यावी, या मागण्यांचे निवेदन निपाणी येथील तहसीलदार श्री. प्रकाश गायकवाड यांना हिंदु जनजागृती समितीच्या पुढाकाराने देण्यात आले. या वेळी श्रीराम सेनेचे सर्वश्री राजू कोपर्डे, सचिन तावदारे, अमोल संकपाळ तसेच अन्य कार्यकर्ते, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. अजित पाटील, धर्मप्रेमी श्री. विशाल हजारे आणि श्री. सूरज पाटील, सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते.
या वेळी निवेदन स्वीकारल्यावर तहसीलदार म्हणाले, ‘‘निपाणी परिसरात कुठे अवैध पशूवधगृह आढळल्यास मला सांगा, मी त्यावर कारवाई करतो.’’