- चीन ज्याप्रमाणे जिहादी मानसिकतेचे लोक आणि जिहादी आतंकवादी निर्माण होऊ नयेत; म्हणून गेल्या काही वर्षांपासून जगाची कुठलीही भीडभाड न ठेवता कठोर निर्णय घेत आहे, ते पहाता भारताने त्याच्याकडून शिकण्याची आवश्यकता आहे !
- चीनच्या अशा प्रयत्नांमुळेच तेथे जिहादी आतंकवाद होणे दुरापास्त आहे. चीनच्या या कृतीतून ‘आतंकवाद्यांना धर्म असतो’, हेही अधिक स्पष्ट होते !
बीजिंग : चीनच्या प्रशासनाने ‘हलाल रेस्टॉरंट्स’ आणि ‘फूड स्टॉल्स’वरून इस्लामशी संबंधित चिन्हे अन् अरेबिक भाषेतील लिखाण त्वरित काढण्याचा आदेश दिला. चीनमधील मुसलमानांचे सांस्कृतिकदृष्ट्या चिनीकरण करण्यासाठी हे पाऊल उचलण्यात आले आहे. चीनमध्ये मुसलमानांची संख्या २ कोटी इतकी असून ते विशेषत: उघुर प्रांतात रहातात.
१. बीजिंगमधील हलाल रेस्टॉरंट्समधील कर्मचार्यांनी नाव न सांगण्याच्या अटीवर सांगितले की, इस्लामशी संबंधित चिन्हे, अरेबिक भाषेतील लिखाण अशा सगळ्या गोष्टी फलकांवरून हटवण्याचा आदेश देण्यात आला आहे. या ‘रेस्टॉरंट्स’मधील कर्मचारी या आदेशाचे पालन करत आहेत कि नाही ?, याची शहानिशाही प्रशासकीय अधिकार्यांनी केली आहे. ‘ही विदेशी संस्कृती असून तुम्ही चिनी संस्कृतीचा अंगीकार केला पाहिजे’, असेही त्यांना बजावण्यात आले आहे.
२. मशिदीवर अरबी ठसा असलेले घुमट काढायला लावून त्याजागी ‘चिनी पॅगोडा’ची (उंच मनोर्याची) शैली आणण्यात आली होती.
३. बीजिंगमध्ये सुमारे १ सहस्र ‘हलाल रेस्टॉरंट्स’ आणि ‘फूड शॉप’ आहेत. या सगळ्यांवर, तसेच आजूबाजूच्या प्रदेशातील ‘रेस्टॉरंट्स’वरही कारवाई करण्यात येणार आहे. अनेक ‘रेस्टॉरंट्स’नी अरेबिक अक्षरे पालटून चिनी भाषेत केली आहेत. काहींनी अरेबिक अक्षरे झाकली आहेत.
४. विदेशी हस्तक्षेपामुळे धार्मिक समूहांवर नियंत्रण ठेवणे कठीण जाते. त्यामुळेच अरेबिक शब्द आणि इस्लामशी संबंधित चिन्हांवर चीनकडून बंदी घालण्यात आल्याचे तज्ञांचे म्हणणे आहे. ‘इस्लामचे अनुकरण करणार्यांनीही चीनमध्ये चिनी भाषेतूनच व्यवहार करावा आणि चिनी संस्कृतीचा पुरस्कार करावा, अशी चीन सरकारची अपेक्षा आहे’, असेही तज्ञांनी म्हटले आहे.
५. चीन प्रशासनाच्या आदेशानंतर अनेक चर्चही बंद करण्यात आली आहेत, तसेच ‘क्रॉस’ अवैध असल्याचे सांगत अनेक ‘क्रॉस’ काढून टाकण्यात आले आहेत.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात