Menu Close

बिजनौर (उत्तरप्रदेश) येथे टिळा लावून मंदिरात आलेल्या दोन धर्मांधांकडून मूर्तीची तोडफोड

  • ‘गोहत्या करणार्‍यांना आणि ‘जय श्रीराम’ न म्हणणार्‍यांना होणार्‍या मारहाणीमुळे अल्पसंख्यक भयभीत झाले आहेत’, अशी ओरड करणारे निधर्मीवादी, पुरो(अधो)गामी अभिनेते, लेखक आदी या घटनेविषयी तोंड का उघडत नाहीत ? कि या घटना हिंदूंना भयभीत करण्यासाठी असल्याने ते गप्प आहेत ?
  • हिंदूंनो, पोलीस मंदिरांचे रक्षण करतील, अशी अपेक्षा करण्याऐवजी सतर्क आणि जागरूक राहून स्वतःच मंदिरांचे रक्षण करा !

बिजनौर (उत्तरप्रदेश) : येथील राम चौकाजवळील प्राचीन पंचमुखी हनुमान मंदिरामध्ये भाविक पूजा करत असतांना २ तरुण कपाळावर टिळा लावून आले आणि त्यांनी मंदिरातील श्री दुर्गादेवीच्या मूर्तीची दगड मारून तोडफोड केली. या वेळी उपस्थित भाविकांनी लगेच या दोघांना पकडून पोलिसांच्या कह्यात दिले. त्यांची चौकशी करण्यात आल्यावर एकाचे नाव आदिल आणि दुसर्‍याचे नाव शादाब असल्याचे उघड झाले. हे दोघेही बिजनौर येथील निवासी आहेत. त्यांनी काही दिवसांपूर्वी या मंदिरात मांसही फेकले असल्याचीही स्वीकृती दिली; मात्र मंदिर समितीने ही घटना पसरू दिली नव्हती. मंदिराच्या पुजार्‍याच्या म्हणण्यानुसार हे दोघेही काही दिवसांपासून मंदिराच्या जवळ सातत्याने दिसत होते. सध्या पोलिसांनी येथील बंदोबस्तात वाढ केली आहे.

काही दिवसांपूर्वी येथील एका मदरशातून शस्त्रसाठा जप्त करण्यात आला होता, तर नगीना भागातील एका मदरशामध्ये स्फोट झाला होता. या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यामध्ये धर्मांधांकडून जाणीवपूर्वक हिंसाचार करण्याचे षड्यंत्र रचण्यात येत असल्याचे बोलले जात आहे.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *