हिंदूंच्या देवतांविषयी अश्लील ट्वीट केल्याचे प्रकरण
- हिंदूंच्या श्रद्धास्थानांच्या अवमानाकडे दुर्लक्ष करणारे पोलीस अन्य धर्मियांच्या श्रद्धास्थानांविषयी अशी दिरंगाई करतील का ?
- हिंदुत्वनिष्ठ विचारांच्या अभिनेत्री पायल रोहतगी यांचे ट्विटर खाते ब्लॉक करणार्या पोलिसांकडून हिंदूंच्या देवतांविषयी अश्लील ट्वीट करणार्या अशी कलीम यांच्यावर कारवाई का केली जात नाही ? हिंदू सहिष्णु आहेत म्हणून पोलीस असा कारभार करत आहेत का ? याविषयी सरकारने कठोर पाऊल उचलावे, अशी हिंदूंची अपेक्षा आहे !
मुंबई : हिंदूंच्या देवतांविषयी सातत्याने अश्लील, भडकावू आणि आक्षेपार्ह टिपणी करणार्या मुस्लिम लेखिका अशी कलीम यांच्या विरोधात मुंबई उच्च न्यायालयाच्या अधिवक्त्या चांदनी शाह यांनी पोलिसांत तक्रार करून १० दिवस झाले, तरी कारवाई करण्यास पोलिसांकडून दिरंगाई होत आहे. अशी कलीम यांनी हिंदूंचे आराध्य दैवत भगवान श्रीकृष्णाचा ‘बलात्कारी’, तर श्री दुर्गादेवीचा ‘वेश्या’ असा उल्लेख केला, तसेच सीतामातेविषयी आक्षेपार्ह ट्वीट केले होते. अशा प्रकारे हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावणारे ट्वीट करूनही पोलिसांनी अद्यापही या विरोधात कारवाई केलेली नाही. याविषयी धर्मप्रेमी हिंदूंकडून संताप व्यक्त करण्यात येत आहे.
अशी कलीम यांनी एका ट्वीटमध्ये ‘१ टक्के मुस्लिमांनी या देशावर राज्य केले, आज आम्ही (मुस्लीम) २० टक्के आहोत’, असे हिंदूंना चेतावणी देणारे वक्तव्य केले होते. तसेच राधा, शिवशंकर, ब्रह्मदेव आदी हिंदूंच्या श्रद्धास्थानांविषयी अतिशय अश्लील विधाने केली आहेत.
अधिवक्त्या चांदनी शाह यांनी १९ जुलै या दिवशी बांद्रा, बीकेसी येथील सायबर पोलीस ठाण्यात जाऊन कलीम यांच्या विरोधात तक्रार केली. या वेळी सायबर पोलिसांनी त्यांना तक्रारीची प्रत जवळच्या पोलीस ठाण्यात देण्यास सांगितली. त्यानुसार २० जुलै या दिवशी अधिवक्त्या शाह गोरेगाव येथील बांगूरनगर पोलीस ठाण्यात तक्रार करण्यासाठी गेल्या. या ठिकाणी अधिवक्त्या शाह यांनी भारतीय दंड विधान संहिता १८६० चे कलम २९५-क, २९८, ५०४, ५०५ अन्वये धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी अशी कलीम यांच्या विरोधात अजामीनपात्र गुन्हा प्रविष्ट करण्याची मागणी केली.
प्रथमदर्शी अहवाल (एफ्आयआर्) नोंदवून घेण्यास पोलिसांची दिरंगाई
या वेळी ‘अन्य कुठे ‘एफ्आयआर्’ झाला आहे का, याची पडताळणी करायला वेळ लागेल’, असे कारण देत पोलिसांनी गुन्हा प्रविष्ट करण्यास टाळाटाळ केली. याविषयी केवळ लेखी तक्रार घेऊन पोलिसांनी त्याची पोच दिली. त्यानंतर २२ जुलै या दिवशी जबाब नोंदवण्यासाठी पोलिसांनी अधिवक्त्या चांदनी शाह यांना पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावले.
त्यानंतर ८ दिवस होऊनही धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी पोलिसांनी कोणतीही कारवाई केलेली नाही. कारवाई करण्यास पोलीस उदासीनता दाखवत असल्याचे दिसून येत आहे. या प्रकरणी अधिवक्त्या चांदनी शाह पाठपुरावा करत असूनही अद्याप अशी कलानी यांच्या विरोधात गुन्हा नोंदवण्यात आलेला नाही.
धार्मिक भावना दुखावल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद करून कारवाई व्हायला हवी ! – अधिवक्त्या चांदनी शाह, मुंबई उच्च न्यायालय
आपण एका सर्वधर्मसमभाव बाळगणार्या देशात रहातो. येथे अशा प्रकारे धार्मिक भावना दुखावणे योग्य नाही. हिंदु समाज सहिष्णु आहे. नागरिकांना घटनेने दिलेल्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याचा दुरुपयोग करू नये. संबंधित प्रकार हा कायद्याने शिक्षेस पात्र असलेला गुन्हा आहे. अशा प्रकारे‘ट्विटर हॅन्डल’ चालवणार्या व्यक्तीवर कारवाई झालीच पाहिजे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात