बकरी ईदनिमित्त होणारी गोवंशांची हत्या रोखा ! – धर्माभिमानी हिंदूंची मागणी
वाराणसी : यंदा १२ ऑगस्टला असलेल्या बकरी ईदच्या दिवशी कसायांकडून गोहत्या होण्याची शक्यता असल्याने गोहत्या रोखण्यात याव्यात, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीने धर्माभिमानी हिंदूंसह १ ऑगस्ट या दिवशी वाराणसीच्या जिल्हाधिकार्यांकडे एका निवेदनाद्वारे केली. बकरी ईदच्या दिवशी तात्पुरते पशूवधगृह बनवण्याची अनुमती देण्यात येऊ नये आणि केंद्रशासनाने देशात तात्काळ गोहत्या प्रतिबंधात्मक कायदा लागू करावा, अशीही मागणी धर्माभिमानी हिंदूनी केली. या वेळी जिल्हाधिकार्यांनी तुम्ही चिंता करू नका, गोहत्या होऊ दिली जाणार नाही, असे आश्वासन दिले.
समितीने आवाहन केले की, प्रशासनाकडून नेहमीच हिंदूंना ईको फ्रेंडली गणेशोत्सव, ईको फ्रेंडली होळी, ईको फ्रेंडली दीपावली साजरी करण्याचे आवाहन केले जाते. त्याप्रमाणे अन्य पंथियांना गोहत्या करण्यापासून परावृत्त करून ईको फ्रेंडली बकरी ईद साजरी करण्याचे आवाहन करावे.
राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी कृती समितीची स्थापना करा !
१५ ऑगस्टला सायंकाळी रस्ते, कचरापेटी, नाले आदी ठिकाणी राष्ट्रध्वज पडलेले आढळतात. अशा प्रकारे होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी हिंदु जनजागृती समितीने मुंबई उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यावर निर्णय देतांना न्यायालयाने राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी शासनाला आदेश दिला होता. त्यानुसार केंद्रीय आणि राज्य गृहखाते, तसेच शिक्षण विभाग यांनी परिपत्रकही काढले होते. त्यानुसार सरकारने राष्ट्रध्वजाचा अवमान तात्काळ रोखण्यासाठी कृती समितीची स्थापना करावी, अशीही मागणी जिल्हाधिकार्यांना दिलेल्या निवेदनात करण्यात आली आहे.
या वेळी अधिवक्ता अरुण मौर्या, अधिवक्ता मदनमोहन यादव, अधिवक्ता संजीवन यादव, इंडिया विथ विजडमचे अधिवक्ता अनुराग पाण्डेय, नागरिक सेवा समितीचे अधिवक्ता अनुप सेठ, हिंदु जागरण मंचाचे श्री. रवि श्रीवास्तव, हिंदु जनजागृती समितीचे श्री. नीलय पाठक आदी उपस्थित होते.