हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा !’ चळवळ
बोंगाईगांव (आसाम) : १५ ऑगस्ट या स्वातंंत्र्यदिनाच्या निमित्ताने राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यात यावा, यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथील जिल्हा उपायुक्त आणि वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना निवेदन देण्यात आले. या वेळी कोक्राझार येथील हिंदु संथाल संस्कृती सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष सर्वश्री जेठा हसदा आणि कार्यकर्ते बाबूसाहेब टुडू, हिंदु जनजागृती समितीचे जयदीप पटवा, धर्माभिमानी खुश्वंतो नाथ, राम संजीवन रॉय, अमरजीत रॉय आदी उपस्थित होते.
१५ ऑगस्टच्या दिवशी ध्वजारोहणानंतर मुलांनी खेळण्यासाठी घेतलेले कागदाचे किंवा प्लास्टिकचे राष्ट्रध्वज रस्त्यावर आणि कचर्यात पडलेेले आढळून येतात. हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे, तसेच हा देशासाठी बलीदान देणार्या स्वातंत्र्यविरांचाही अवमान आहे. जे ध्वजसंहितेनुसार राष्ट्रध्वजाचा मान ठेवत नाहीत, त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.