गौहत्ती (आसाम) येथे हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीत हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी जागृती
गौहत्ती (आसाम) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या वेळी समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी हिंदूंची सध्याची स्थिती, धर्माधिष्ठित हिंदु राष्ट्राची आवश्यकता आणि समितीच्या वतीने चालवण्यात येत असलेले उपक्रम यांविषयी उपस्थितांना माहिती दिली. या बैठकीला कामरूख आणि गौहत्ती येथील हिंदुत्वनिष्ठ, तसेच मुसळधार पावसामुळे गुरुपौर्णिमेला उपस्थित राहू न शकलेले काही हिंदुत्वनिष्ठ यांनी या बैठकीचा लाभ घेतला. या वेळी समितीचे श्री. विश्वनाथ कुंडू आणि श्री. योगेश पांड्ये उपस्थित होते.
क्षणचित्र : गुरुपौर्णिमेला आलेले एक हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता त्यांच्या समवेत दोन हिंदुत्वनिष्ठांना घेऊन आले होते. त्यांनी त्यांच्या क्षेत्रात अशा बैठका घेऊन हिंदु राष्ट्राच्या स्थापनेविषयी जागृती करू, असे सांगितले.
चिरांग (आसाम) येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठक
हिंदु ओरान संस्कृती सुरक्षा परिषद आणि हिंदु संथाल संस्कृती सुरक्षा यांचा सहभाग
चिरांग (आसाम) : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने हिंदु राष्ट्र-जागृती बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी संबोधित केले. या बैठकीला हिंदु ओरान संस्कृती सुरक्षा परिषदेचे स्थानिक अध्यक्ष श्री. अजय कुमार शाह, हिंदु संथाल संस्कृती सुरक्षा परिषदेचे अध्यक्ष श्री. जेठा हसदा, हिंदु जनजागृती समितीचे श्री. जयदीप पटवा आदी हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.
क्षणचित्र : हिंदु ओरान संस्कृती सुरक्षा परिषद आणि हिंदु संथाल संस्कृती सुरक्षा परिषद यांनी आमच्या कार्यकर्त्यांना हिंदु जनजागृती समितीने धर्मशिक्षण द्यावे, तसेच त्यांच्यासाठी उपक्रम चालवावा, अशी मागणी केली.
गौहत्ती (आसाम) येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराचे पुजारी (दलोय) श्री. कबिंद्रप्रसाद शर्मा यांची भेट
गौहत्ती (आसाम) : हिंदु जनजागृती समितीचे पूर्व आणि पूर्वोत्तर भारत राज्य समन्वयक श्री. शंभु गवारे यांनी येथील प्रसिद्ध कामाख्या मंदिराचे पुजारी (दलोय) श्री. कबिंद्रप्रसाद शर्मा यांची नुकतीच भेट घेतली. या वेळी त्यांना गोवा येथे झालेले अष्टम अखिल भारतीय हिंदू अधिवेशन आणि मंदिर संस्कृती रक्षा अभियान यांविषयी माहिती देण्यात आली.
श्री. शर्मा यांनी संपूर्ण विषय लक्षपूर्वक जाणून घेतला आणि समितीच्या कार्याची प्रशंसा केली. याप्रसंगी समितीचे श्री. विश्वनाथ कुंडू उपस्थित होेते.