मुसलमान कर्मचार्याकडून अन्नपदार्थाचा पुरवठा नाकारल्याचे प्रकरण
- देशात अनेक अयोग्य घटना घडत असतांना पोलीस किती प्रकरणांत स्वतःहून पुढाकार घेऊन कृती करतात ? अनेक प्रसंगांत हिंदूंच्या धार्मिक भावना दुखावल्या जातात, देवतांचा अवमान केला जातो, अशा वेळी पोलीस निष्क्रीयच असतात !
- कोणी तक्रार केली, तर ती नोंदवण्यास नकार देतात किंवा त्यालाच दमदाटी करतात; मात्र या प्रकरणात काँग्रेस सरकारने आदेश दिल्यामुळेच पोलिसांनी ही तत्परता दाखवली आहे, हेच लक्षात येते !
- काँग्रेसच्या राज्यातील मोगलाई ! व्यक्तीस्वातंत्र्यावर घाला घालण्याचा प्रयत्न करणार्या काँग्रेस सरकारच्या विरोधात एकही पुरो(अधो)गामी आता तोंड उघडत नाही, हे लक्षात घ्या !
जबलपूर (मध्यप्रदेश) : येथील पंडित अमित शुक्ला यांनी झोमॅटो या आस्थापनाकडून मागवलेले अन्नपदार्थ एका मुसलमान कर्मचार्याने आणले होते. शुक्ला यांनी ते परत पाठवत हिंदु कर्मचार्याकडून अन्नपदार्थ पाठवण्याची मागणी झोमॅटोकडे केली होती; मात्र त्यांनी ती फेटाळली. त्यामुळे शुक्ला यांनी अन्नपदार्थाची दिलेली मागणीच रहित केली होती. या प्रकरणी आता पोलिसांनी शुक्ला यांना नोटीस बजावून कारागृहात डांबण्याची चेतावणी दिली आहे.
जबलपूरचे पोलीस अधीक्षक अमित सिंह म्हणाले की, लोकांच्या धार्मिक भावना दुखावल्या जाणार असतील, तर तो गुन्हा आहे. या प्रकरणी कोणीही तक्रार प्रविष्ट केलेली नाही; मात्र शुक्ला यांच्या याविषयीच्या ट्वीटची स्वतःहून नोंद घेत पोलिसांनी त्यांना नोटीस पाठवली आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात