आतंकवादी झालेल्यांचा शेवट असाच होतो आणि होत रहाणार, हे जिहाद्यांना माहिती असूनही ते या मार्गावर जातात; कारण ते धर्माच्या आधारेच त्याकडे वळालेले असतात, हे सत्य नाकारता येणार नाही !
थिरूवनंतपूरम् (केरळ) : केरळमधून इस्लामिक स्टेट (आयएस्) या जिहादी आतंकवादी संघटनेत भरती होऊन अफगाणिस्तानमध्ये गेलेला महंमद मुहसिन अमेरिकी सैन्याच्या कारवाईत ठार झाल्याचे वृत्त प्रसिद्ध झाले आहे. त्यासमवेत ‘आयएस्’चा कमांडर हुजैफा-अल्-बकिस्तान हाही ठार झाला आहे. मुहसिन ठार झाल्याची बातमी त्यांच्या कुटुंबियांना ‘व्हॉट्सअॅप’ वर आली आहे. मल्याळम भाषेत लिहिण्यात आलेल्या संदेशामध्ये या घटनेविषयी पोलिसांना कळवू नये, असे नमूद करण्यात आले आहे. कुटुंबियांना मुहसिनच्या मृतदेहाचे छायाचित्रही पाठवण्यात आले आहे.
मुहसिन केरळच्या मुसलमानबहुल मल्लपूरम् जिल्ह्यातील इडप्पल येथे रहाणारा होता. तो वर्ष २०१७ पासून बेपत्ता होता. बकिस्तान हा भारतीय मुसलमान तरुणांना आतंकवादी होण्यासाठी भडकावत होता. केरळमधून आतापर्यंत ४० हून अधिक जण ‘आयएस्’मध्ये भरती झाल्याची माहिती सुरक्षायंत्रणांकडे आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात