जळगाव : धर्मांतर आणि लव्ह जिहादच्या घटना थांबाव्यात यासाठी कठोर पावले उचलली जावीत. पाकिस्तान सरकार आणि आंतरराष्ट्रीय मानवाधिकार आयोग यांनी अशा घटनांची गंभीर नोंद घेऊन संबंधितांवर कठोर कारवाई करावी. भविष्यात अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी त्यांच्यावर दबाव आणण्यात यावा. भारतामध्येही काही भागात अशा घटना घडत असून, त्याविषयी भारत सरकारने गंभीर नोंद घेऊन अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी योग्य ती कारवाई करावी, अशी विनंती सिंधी बांधवांनी जिल्हाधिकारी यांच्या वतीने राष्ट्रपतींकडे एका निवेदनाद्वारे केली आहे. भारतीय सिंधू सभेची राष्ट्रीय चिंतन बैठक २७ आणि २८ जुलै या दिवशी भोपाळ येथे झाली. त्या वेळी वरील ठराव करण्यात आले. निवेदन देतांना डॉ. गुरुमुख जगवानी, श्री. राजूभाई आडवाणी, श्री. मनोज आहुजा, सौ. रेशमा बहरानी, श्री. संजय हिरानी आदी मान्यवर उपस्थित होते. निवेदनात म्हटले आहे की,
१. भारतीय सिंधू सभा १९७९ पासून अखिल भारतीय स्तरावर कार्यरत आहे. ही संघटना सेवा, संघटन आणि उच्च मूल्याचे संस्कार या माध्यमातून सिंधी समाजात एकात्म भाव जपण्याचे, तो वृद्धींगत करण्याचे काम करत आहे.
२. अखंड भारताच्या झालेल्या फाळणीत आपले सर्वस्व समर्पित करून सिंधी समाज आज भारतासह जगातील विविध भागांत स्थिरावला आहे. या काळात सिंधी समाजाने स्वत:वरील सनातन धर्माचे पूर्वापार संस्कार जपले असून त्यांना आपली ओळख बनवले आहे; परंतु वर्तमानात पाकिस्तानातील सिंधी समाज संकटात आहे.
३. पाकिस्तानातील काही तत्त्वे समाजाची परंपरा छेदण्याचा प्रयत्न (डावीकडेकरत आहेत. युवा पिढीची दिशाभूल करून त्यांचे धर्मांतर घडवून आणणे, मुलींचे अपहरण करून त्यांचा धर्म बळजोरीने पालटून त्यांच्याशी विवाह करणे आदी प्रकार होत आहेत.
४. सिंध प्रांतात अशा घटनांची संख्या अधिक आहे. यामुळे पाकिस्तानातील अल्पसंख्यांक हिंदु समाजात भयाचे आणि संतापाचे वातावरण आहे. भारतामधील काही वृत्तपत्रांत प्रसिद्ध झालेल्या वृत्तांनुसार, ११ ते १५ वर्षे वयोगटातील हिंदु मुली अशा घटनांना अधिक संख्येने बळी पडल्या असल्याचे आढळून आले आहे.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात