हिंदु जनजागृती समितीच्या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहिमेला पुणे, सांगली आणि कोल्हापूर येथे लाभलेला सकारात्मक प्रतिसाद !
पुणे : स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी न्यायालयाच्या निर्णयानुसार कार्यवाही करण्यात यावी, या आशयाचे निवेदन हिंदु जनजागृती समितीच्या वतीने पुण्याचे जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांना २९ जुलै या दिवशी देण्यात आले. या वेळी जिल्हाधिकारी नवलकिशोर राम यांनी राष्ट्रध्वजाचा होणारा अवमान रोखण्यासाठी आवश्यक कार्यवाही नक्की करू, असे आश्वासन दिले. हे निवेदन देण्यासाठी धर्मप्रेमी अशोक केडगे, श्री. हनुमंत आंबेवाडीकर, रणरागिणी शाखेच्या कु. क्रांती पेटकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. पराग गोखले आणि श्री. कृष्णाजी पाटील उपस्थित होते.
पुणे महानगरपालिकेचे सदस्य महेश वाळिंबे, अश्विनी कदम, प्रसन्नदादा जगताप, आनंद रिठे, शंकर पवार, ज्योती गोसावी, अश्विनी पोकळे, तसेच पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे सदस्य अश्विनी बोबडे यांनाही समितीच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी काही सदस्यांनी ‘संपूर्ण वन्दे मातरम्’च्या व्हिडिओची मागणी केली. पुणे शहाराच्या साहाय्यक पोलीस आयुक्त रवींद्र रसाळ यांनीही कार्यवाहीच्या सूचना देणार असल्याचे सांगितले. पुणे येथे आतापर्यंत ८ शाळांमध्येही हे निवेदन देण्यात आले आहे.
निवेदनानंतर लोकप्रतिनिधी आणि पोलीस यांच्याकडून मिळालेल्या सकारात्मक प्रतिक्रिया
१. पालिकेच्या सर्व शाळांमध्ये ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान कसा राखावा’ याविषयी पत्र पाठवणार ! – पिंपरी-चिंचवडचे महापौर राहुल जाधव आणि पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर
२. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री होतांना दिसल्यास कार्यवाही करू. – जुन्नरचे नायब तहसीलदार सचिन मुंढे
३. निवेदनावर त्वरित पत्र लिहून ते आयुक्त आणि जिल्हाधिकारी यांना पाठवतो अन् उपाययोजना काढतो. – पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेचे स्थायी समितीचे सभापती विलासराव मडिगेरी
४. तुमचे कार्य पुष्कळ चांगले आहे. राष्ट्राभिमान ठेवून प्रत्येकानेच राष्ट्रध्वजाची विटंबना रोखायला हवी. राष्ट्रध्वजाची विटंबना रोखली जावी, यासाठीजनजागृती करावी लागते, याची खंत वाटते. जिथे हे ध्वज बनवले जातात, तिथेच थेट शासनाने कठोर कार्यवाही करायला हवी. – हडपसर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रघुनाथ जाधव
५. तुमचा उपक्रम पुष्कळ चांगला आहे. उपक्रमाची प्रसिद्धीमाध्यमांतून प्रसिद्धी आणि जनजागृती व्हायला हवी. आमच्या स्तरावर शक्य होईल तेवढे साहाय्य आम्ही करू. – साहाय्यक वरिष्ठ पोलीस निरीक्षक (गुन्हे) सत्यवान पाटील
६. पोलीस खात्याच्या वतीने आम्ही सर्व सहकार्य करू. हे निवेदन आम्ही सर्व पोलीस ठाण्यांत पाठवू. – पिंपरीचे सह आयुक्त (गुन्हे शाखा), सुधीर हिरेमठ
कोल्हापूर-सांगली जिल्ह्यात प्रशासकीय अधिकारी, पोलीस आणि शाळा प्रशासन यांना निवेदन
कोल्हापूर : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने सांगली-कोल्हापूर जिल्ह्यातही प्रशासकीय अधिकारी, पोलीस, शाळा-महाविद्यालय प्रशासन यांना निवेदन देण्यात आले. मलकापूर येथे शाहूवाडी येथील पंचायत समितीचे विस्ताराधिकारी (शिक्षण) श्री. पी.के. चौगुले यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री रमेश पडवळ, दिलीप कुंभार, आशिष कोळवणकर, मानसिंग देसाई, विक्रांत मोरबाळे, प्रसाद कुलकर्णी उपस्थित होते. विस्ताराधिकार्यांनी ‘निवेदनातील मजकूर सर्व शाळांना कळवण्यात येईल’, असे सांगितले.
सांगली
१. मिरज येथे नायब तहसीलदार श्री. संजय इंगळे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी शिवसेना व्यापारी सेनेचे श्री. पंडितराव (तात्या) कराडे, सनातन प्रभातचे वाचक श्री. विठ्ठल मुगळखोड, बजरंग दलाचे श्री. आकाश जाधव उपस्थित होते. माजी नगरसेवक श्री. विठ्ठल खोत यांनाही निवेदन देण्यात आले.
२. मिरज येथे बालशिक्षण मंदिर येथे मुख्याध्यापिका सौ. सुजाता कुलकर्णी यांना निवेदन देण्यात आले. त्यांनी विद्यार्थ्यांसाठी ‘गुणसंवर्धन’ हा विषय मांडण्यास समितीला निमंत्रित केले आहे. आर्.एम्. हायस्कूल येथे मुख्याध्यापिका सौ. स्वाती रघुनाथ बाबर यांनी निवेदन स्वीकारल्यावर ‘नैतिक मूल्यांचे संवर्धन’ या विषयावर मार्गदर्शन करण्यास बोलावले आहे. याचसमवेत एम्.ई.एस्. इंग्लिश स्कूल, ज्युबिली कन्या शाळा, विद्या मंदिर प्रशाला, आदर्श शाळा येथेही निवेदन देण्यात आले.
३. बत्तीस शिराळा येथे नायब तहसीलदार श्री. व्ही.डी. महाजन, पोलीस अधिकारी एम्.जी. नगरजी, गटशिक्षणाधिकारी श्री. प्रदीप कुडाळकर, तरुण मित्र मंडळ तालुका वाचनालयाचे अध्यक्ष श्री. हसबनीस यांच्यासह सात शाळांमध्ये निवेदन देण्यात आले.
४. कवठेमहांकाळ येथील निवासी नायब तहसीलदार श्री. किरण भिसे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी हिंदुत्वनिष्ठ श्री. वैभव भोसले आणि श्री. अक्षय वडर उपस्थित होते.