Menu Close

ब्रुसेल्स फक्त सुरुवात, युरोपमध्ये आणखी हल्ले घडणार : इस्लामिक स्टेट

ब्रुसेल्स हल्ला फक्त सुरुवात आहे. इस्लामिक स्टेट (आयएसआयएस) सीरिया आणि इराकमधील बॉम्ब हल्ले थांबवणार नाही, असा इशारा या दहशतवादी संघटनेचा निष्‍ठावंत आणि शरिया फॉर बेल्जियम ग्रुपचा दहशतवादी हिचम चैबने दिला आहे.

आयएसआयएसने एक नवा व्हिडिओ प्रसिध्‍द केला आहे. यात चैब अरबी भाषेत बोलत आहे. तो युरोपवर टीका करतो आणि सीरियावरील बॉम्ब हल्ल्याचा बदला तुमच्या लोकांच्या हत्या करुन घेतला जाईल, असे सांगितले. आयएसआयएसचा हा व्हिडिओ शनिवारी प्रसिध्द करण्‍यात आला होता.

पाश्‍चात्त्य देश जितके आमच्या मुस्लिमांना एफ-१६ उडवतील, त्या प्रमाणात त्यांचे लोक मारले जातील, असा इशारा चैबने दिला आहे. बेल्जियमवर हल्ले चालू राहतील, असेही त्याने सांगितले.

संदर्भ : दिव्य मराठी

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *