हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ मोहीम !
मुंबई : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिक तसेच कागदी ध्वजांच्या वापरामुळे आणि अन्य मार्गांनी होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखला जावा, अवमान करणार्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, यासाठी हिंदु जनजागृती समितीसह अन्य राष्ट्रप्रेमींच्या वतीने माहिम पोलीस ठाण्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गडांकुश यांना निवेदन देण्यात आले. या वेळी सर्वश्री मयूर कांबळे, विनोद पागधरे आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अनिल नाईक उपस्थित होते.
क्षणचित्र : या वेळी वरिष्ठ पोलीस निरीक्षक मिलिंद गडांकुश यांनी हिंदु जनजागृती समिती निर्मित ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ ही ध्वनिचित्रफीत पाहिली आणि ‘समितीच्या मोहिमेला सहकार्य करू’, असे सांगितले.