हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राऊरकेला (ओडिशा) येथे प्रवचन
राऊरकेला (ओडिशा) : ‘अधर्म एवं मूलं सर्व रोगाणाम्’ असे शास्त्रवचन आहे. म्हणजे सर्व रोग आणि समस्या यांचे मूळ कारण अधर्म आहे. आज पाश्चात्त्य संस्कृतीच्या प्रभावात आम्ही आमच्या संस्कृतीचे आचार-विचार विसरल्याने आम्ही शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या दुर्बळ झालो आहोत. त्यामुळे धर्मशिक्षण घेऊन दैनंदिन जीवनात धर्माचरण करून प्रत्येक हिंदूने आपले आध्यात्मिक बळ वाढवण्यासाठी प्रयत्न करावा, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे ओडिशा राज्य समन्वयक श्री. प्रकाश मालोंडकर यांनी बिरमित्र येथील शिशुमंदिरामध्ये झालेल्या प्रवचनात नुकतेच केले. स्थानिक हिंदुत्वनिष्ठ श्री. शिवचरण गोप आणि धर्माभिमानी युवक-युवती यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले.
क्षणचित्र : प्रवचनाच्या वेळी धार्मिक कृतींचे शास्त्र सांगणारी ध्वनीचित्रफीत दाखवण्यात आली.