Menu Close

‘कलम ३७०’ आणि ‘३५ अ’ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यात विविध उपक्रम

जळगाव : कलम ३७० आणि ३५ अ रहित केल्याप्रकरणी जळगाव जिल्ह्यातील चोपडा, यावल, भुसावळ, एरंडोल येथे विविध मार्गांनी समर्थन करण्यात आले.

चोपडा

चोपडा येथे भारतमातेचे पूजन करून घोषणा देतांना धर्मप्रेमी

येथील छत्रपती शिवाजी चौकात भारतमातेचे पूजन करून ‘वन्दे मातरम्’, ‘भारतमाता की जय’ अशा वीरश्रीयुक्त घोषणा देण्यात आल्या. या वेळी भाजपचे श्री. मनीष गुजराथी, श्री. गजेंद्र जैस्वाल, श्री. राजू शर्मा, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे श्री. राजेंद्र स्वामी, श्री. मुरलीधर पाटील, श्री. श्याम सोनार, स्वराज्य निर्माण सेनेचे श्री. योगेश बडगुजर, श्री. सुनील सोनगिरे, सनातन संस्थेचे श्री. अनिल पाटील, हिंदु जनजागृती समितीचे श्री. यशवंत चौधरी आदी धर्मप्रेमी उपस्थित होते.

यावल

येथील भाजपचे आमदार हरिभाऊ जावळे यांचे समितीच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.

भुसावळ

भुसावळ येथील श्री विठ्ठल मंदिरात घोषणा देतांना धर्मप्रेमी

येथे श्री विठ्ठल मंदिरात सामूहिकरित्या ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. तसेच घोषणा देण्यात आल्या. या उपक्रमास २५ धर्मप्रेमी उपस्थित होते.

एरंडोल

गणपति मंदिरात संपूर्ण  ‘वन्दे मातरम्’ म्हणण्यात आले. या वेळी १८ धर्मप्रेमी उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *