मुंबई : भगवान श्रीकृष्ण आणि ऋषिमुनी यांनी गोपालन केले आहे. श्रीरामाचे पूर्वज राजा रघु यांसारख्या हिंदु राजांनी गोरक्षणाला आपल्या प्राणाहूनही अधिक महत्त्व दिले. त्यामुळे आपल्या देवतांचा आदर्श समोर ठेवून गोरक्षण आणि गोपालन करणे हे हिंदूंचे धर्मकर्तव्यच आहे. सध्या दुधात ६० ते ७० टक्के भेसळ करण्यात येते. अशा दुधाच्या सेवनामुळे वर्ष २०२५ पर्यंत ८० टक्के जनता कर्करोगासारख्या भयावह आजाराला बळी पडू शकते, असे मत जागतिक आरोग्य संघटनेने नोंदवले आहे. त्यामुळे जनतेचे प्राण वाचवण्यासाठीही गोरक्षण महत्त्वाचे आहे, असे प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीचे प्रवक्ते श्री. सतीश कोचरेकर यांनी केले. ‘गौशाळा जीवदया केंद्र’ संचालित गुजरात येथील ‘श्री मां ग्रुप चॅरिटेबल ट्रस्ट, नारा’ यांच्या वतीने मुलुंड (प.) येथील इंद्रप्रथ बॅन्क्वेट येथे ४ ऑगस्टला आयोजित केलेल्या ‘तृतीय लघुरुद्राभिषेक आणि भजन संध्या’ या कार्यक्रमात ते बोलत होते. या वेळी ६०० जण, तसेच हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्तेही उपस्थित होते. समितीच्या कार्याने प्रभावित होऊन ‘श्रीरथ कॅटरर्सचे श्री. मितेश पलन यांनी कार्यक्रमात समितीला विषय मांडण्यासाठी निमंत्रित केले होते. (धर्मप्रसार करण्यासाठी समितीला निमंत्रित केल्याविषयी श्री. मितेश पलन यांचे आभार ! – संपादक)
श्री. कोचरेकर पुढे म्हणाले की, देवतांचे विडंबन, संतांचा अवमान, हिंदु आतंकवाद यांसारख्या विखारी प्रचारातून हिंदूंंंच्या मनातील श्रद्धा संपवण्याचा प्रकार जाणीवपूर्वक केला जात आहे. त्यामुळे हिंदु समाज धर्मापासून दूर गेला आहे. हिंदु युवतीच नव्हे, तर विवाहित हिंदु महिलाही लव्ह जिहादला बळी पडत आहेत. यावर उपाय म्हणून हिंदूंना धर्मशिक्षण देण्यासाठी समितीच्या माध्यमातून प्रयत्न केले जात आहेत.
मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करेन ! – मितेश पलन, श्रीरथ कॅटरर्स
श्री. सतीश कोचरेकर यांनी मांडलेला विषय आवडला. हिंदु मुली लव्ह जिहादमध्ये अडकतात, तेव्हा पुष्कळ चीड येते. मी अशा घटना स्वतः पाहिल्या आहेत. हा विषय अधिकाधिक लोकांपर्यंत पोचला पाहिजे. तुम्ही विविध विषयांच्या रूपरेषा सिद्ध करा. आपण अधिक मोठा कार्यक्रम आयोजित करू. मी आपल्याला सर्वतोपरी सहकार्य करीन.