ढोंगी धर्मनिरपेक्षतावादी धर्मांध ख्रिस्त्यांच्या या आक्रमणाच्या संदर्भात तोंड उघडणार नाहीत; कारण तसे करणे हे धर्मनिरपेक्षतेच्या विरोधात ठरेल ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात
मैनपुरी : येथील नगला रामसिंह गावात ख्रिस्त्यांकडून हिंदूंच्या धर्मांतराला विरोध करण्यासाठी जमलेल्या हिंदुत्ववाद्यांवर ख्रिस्त्यांनी आक्रमण केले. या आक्रमणात अनेक जण घायाळ झाले. घटनेची माहिती दिल्यानंतर एका घंट्यानंतर पोलीस घटनास्थळी दाखल झाले. (अशा पोलिसांवर कठोर कारवाई करण्याची मागणी त्यांच्या वरिष्ठांकडे केली पाहिजे ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) त्यामुळे धर्मांध ख्रिस्ती आक्रमण करून पळून गेले. या घटनेनंतर गावात पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला आहे.
१. येथील संजय नावाच्या तरुणाने ३ वर्षांपूर्वी पंजाबमध्ये जाऊन ख्रिस्ती धर्म स्वीकारला होता. २७ मार्चला इस्टर संडेच्या निमित्ताने त्याने गावातील ३०-४० हिंदूंना घर आणि अन्य प्रलोभने दाखवून ख्रिस्ती करण्यासाठी सिद्ध केले होते. यासाठी २७ मार्चला फिरोजाबाद येथून एक पाद्री आणि अन्य १० जण आले होते.
२. या घटनेची माहिती सरपंच शैलेंद्र यादव यांनी बजरंग दल, विश्व हिंदु परिषद, रा.स्व. संघ आदी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांना दिली. त्यामुळे १२ हून अधिक कार्यकर्ते येथे पोेहोचले.
३. त्यांनी धर्मांतराला विरोध केल्यावर संजय, पाद्री आणि अन्य ख्रिस्ती यांच्यात वाद झाला. त्यातच संजयच्या कुटुंबातील लोकांनी हिंदुत्ववादी कार्यकर्त्यांवर लाठीकाठीद्वारे आक्रमण केले आणि त्यांना मोठ्या प्रमाणात मारहाण केली. (बाटगे अधिक कडवे असतात, ही म्हण सार्थ ठरवणारा प्रसंग ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) यात बजरंग दलाचे सुशील यादव यांचे डोके फुटले, तर दारा सिंह वर्मा, मोहित कुशवाहा, अनुपम शाक्य, संतोष वर्मा, राजेश तिवारी, गोल्डी चौहान आणि संघाचे जिल्हाप्रमुख श्याम घायाळ झाले.
४. या घटनेचे वार्तांकन करण्यासाठी गेलेल्या प्रसारमाध्यमांच्या प्रतिनिधींवरही धर्मांध ख्रिस्त्यांनी आक्रमण केले.
५. डिसेंबर २०१५ मध्ये संजयने त्याच्या १० नातेवाइकांचे धर्मांतर केले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात