इम्रान खान यांची संसदेत विचारणा
पाकने आता आक्रमण करण्याचा प्रयत्न केला, तर जगाच्या नकाशावरून त्याचे अस्तित्वच नष्ट होईल, हे त्याने लक्षात ठेवावे !
इस्लामाबाद : पाकच्या विरोधी पक्षांची नेमकी काय अपेक्षा आहे ? मी पाकिस्तान सैन्याला भारतावर आक्रमण करण्याचा आदेश दिला पाहिजे का ?, अशी विचारणा पाकचे पंतप्रधान इम्रान खान यांनी केली. भारताने कलम ३७० रहित केल्यावर संतप्त झालेल्या पाकने संसदेचे विशेष सत्र बोलावले होते. तेव्हा ‘पाकिस्तान मुस्लिम लीग (एन्)’चे नेते शहबाज शरीफ यांनी ‘पाकिस्तानने कठोर प्रतिक्रिया दिली पाहिजे’, असे मत व्यक्त केले. त्यावर इम्रान खान यांनी वरील विधान केले.
(म्हणे) ‘आणखीएक पुलवामा घडेल !’
इम्रान खान पुढे म्हणाले, ‘‘काश्मीरमधून कलम ३७० हटवल्यामुळे आणखी एक पुलवामा घडेल. पुलवामा येथील आतंकवादी आक्रमणाशी पाकचा काहीही संबंध नव्हता. भारताने कलम ३७० रहित केल्याचे प्रकरण आता संयुक्त राष्ट्राकडे घेऊन जाऊ.’’
(म्हणे) ‘रा.स्व. संघाला भारतात केवळ हिंदूच हवे आहेत !
इम्रान खान पुढे म्हणाले की, रा.स्व. संघाच्या विचारसरणीमुळेच भाजपने ३७० कलम हटवण्याचे काम केले. संघाला भारतात केवळ हिंदूच हवे आहेत. त्यामुळे तेथे असणार्या मुसलमानांना दुय्यम वागणूक दिली जात होती. महंमद अली जीना यांनी ही गोष्ट आधीच ओळखली होती. हिंदूंना पहिले प्राधान्य देण्याच्या जातीयवादी विचारातून भारताची निर्मिती झाली आहे, तर पाकिस्तानमध्ये सर्वांना समानतेची वागणूक दिली जाते.(इम्रान खान यांचा विनोद ! – संपादक)
पाकने भारतासमवेतचे व्यापारी संबंध तोडले
सुंठीवाचून खोकला गेला !
नवी देहली : कलम ३७० रहित करणे आणि जम्मू-काश्मीरचे विभाजन यांवरून संतापलेल्या पाकने भारतासमवेतचे द्विपक्षीय व्यापारी संबंध तोडून टाकल्याची घोषणा केली आहे. ७ ऑगस्टला काश्मीरविषयी झालेल्या पाकच्या राष्ट्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात