मुंबई : धक्कातंत्र वापरून गेल्या ७० वर्षांचा ३७० कलमाचा डाग एका दिवसात पुसणार्या केंद्र शासनाचे अभिनंदन करण्यासाठी आणि हिंदूंना न्याय दिल्याविषयी ईश्वरचरणी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी येथील स्वयंभू हनुमान मंदिरात स्थानिक समस्त हिंंदुत्वनिष्ठांनी एकत्र येत घंटानाद केला.
‘३७० कलमामुळे झालेली हिंदुस्थानची गळचेपी, काश्मिरी हिंदूंचा, तसेच देशातील हिंदूंचा झालेला भ्रमनिरास अशा पार्श्वभूमीवर हे कलम रहित व्हावे; म्हणून हिंदु जनजागृती समिती, तसेच अन्य समविचारी हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी केलेली जागृती याला न्याय मिळाला’, असे मत समितीचे समन्वयक श्री. बळवंत पाठक यांनी व्यक्त केले, तसेच या विजयासाठी हनुमंताच्या चरणी भावपूर्णरित्या कृतज्ञता व्यक्त करण्यात आली.
या कार्यक्रमासाठी शिवकार्य प्रतिष्ठानचे श्री. प्रभाकर भोसले यांनी पुढाकार घेतला. या वेळी मंदिराचे पुजारी श्री. मंगेश पवार, धर्माभिमानी सर्वश्री अंकुश शिंदे, रामकृष्ण भास्कर, महादेव खांडले आदींसह २५ जणांची उपस्थिती होती.
क्षणचित्रे
१. कार्यक्रमाच्या वेळी उत्स्फूर्तपणे जयजयकाराच्या घोषणा देण्यात आल्या.
२. कार्यक्रम संपल्यानंतर सौ. कागणे यांनी कार्य जाणून घेऊन धर्मकार्यात सहभागी होण्याची इच्छा व्यक्त केली.