Menu Close

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विरावली (जळगाव) येथे ‘धर्माचरणाचे महत्त्व’ या विषयावर प्रवचन

धर्माचरण करणारी युवती कधीही लव्ह जिहादला बळी पडणार नाही ! – सौ. क्षिप्रा जुवेकर, हिंदु जनजागृती समिती, जळगाव

प्रवचनाला उपस्थित ग्रामस्थ

जळगाव : सध्या भोळ्या हिंदु युवतींचे ‘लव्ह जिहाद’च्या माध्यमातून धर्मांतर करण्याचे मोठे षड्यंत्र चालू आहे. हिंदु युवतींशी जवळीक साधून, गोड बोलून धर्मांध त्यांना या जाळ्यात अडकवत आहेत. या षड्यंत्रापासून स्वत:चा बचाव करायचा असेल, तर धर्माचरण करायला हवे. धर्माचरण करणारी युवती कधीही लव्ह जिहादला बळी पडणार नाही, असे ठाम प्रतिपादन हिंदु जनजागृती समितीच्या सौ. क्षिप्रा जुवेकर यांनी केले. त्या विरावली येथील श्री विठ्ठल-रुक्मिणी मंदिरामध्ये आयोजित प्रवचनाप्रसंगी बोलत होत्या. या प्रवचनाला १०५ धर्मप्रेमी ग्रामस्थ उपस्थित होते.

त्या पुढे म्हणाल्या, ‘‘आपल्या मुली घरातून बाहेर पडल्यानंतर पुन्हा सुरक्षित येतील का ?’ याची भीती सध्या पालकांमध्ये असते. भारतात ३ वर्षांच्या लहान मुलींपासून ७० वर्षांच्या महिलांवरही बलात्कार होत आहेत. अन्यायाला प्रतिकार करणार्‍या हिंदूंना त्रास देऊन हिंदूंचे शौर्य दाबण्याचा प्रयत्न प्रत्येक ठिकाणी केला जात आहे. पाश्‍चात्त्यांची कुसंस्कृती आपल्या घरांमध्ये दूरदर्शन मालिकांच्या माध्यमातून थेट येत आहे आणि यावर आपले नियंत्रण नाही, ही स्थिती पालटण्यासाठी आपण जागृत होऊन प्रयत्न करायला हवेत.’’

सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली होणार्‍या हिंदूंच्या गळचेपीला संघटित होऊन प्रतिकार करूया ! – प्रशांत जुवेकर, जळगाव जिल्हा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

आज आपले राष्ट्र आणि धर्म संकटात आहे. सर्वधर्मसमभावाच्या नावाखाली हिंदु समाजाला अन्याय्य वागणूक दिली जात आहे. हिंंदूंनी संघटित होऊन याचा प्रतिकार केला पाहिजे.

यावल येथील धर्मप्रेमी श्री. धीरज भोळे यांनी समितीच्या कार्याची ओळख करून देऊन आभारही व्यक्त केले.

क्षणचित्रे

१. बैठकीनंतर गावात मोठा कार्यक्रम घेण्याचे ठरले.

२. उपस्थितांनी समितीच्या कार्यात सक्रिय सहभागी होण्याचा मानस व्यक्त केला.

३. ‘आदर्श गणेशोत्सव कसा साजरा करावा ?’ याविषयीचे चलचित्र पाहून ग्रामस्थांनी यंदाचा गणेशोत्सव आदर्श पद्धतीने साजरा करण्याचा निश्‍चय केला.

४. बैठकस्थळी राष्ट्रपुरुष, क्रांतीकारक, हिंदु धर्म यांविषयीचे फ्लेक्स प्रदर्शन, तसेच सनातनची सात्त्विक उत्पादने आणि ग्रंथ यांंचे प्रदर्शन लावण्यात आले होते.

५. संततधार पावसातही महिलांची लक्षणीय उपस्थिती होती.

६. कार्यक्रमाचे सर्व नियोजन यावल येथील धर्मप्रेमींनी केले. विरावली येथील धर्मप्रेमी युवकांनीही भर पावसात लागेल, ते साहित्य उपलब्ध करून दिले.

Related News

Please enter followup

Your email address will not be published. Required fields are marked *