Menu Close

काश्मीरला अन्याय्य कलमांच्या जोखडातून मुक्त केल्याविषयी यावल आणि पाळधी (जळगाव) येथे आनंदोत्सव

यावल येथील श्री विठ्ठल मंदिरात वन्दे मातरम्चे गायन करतांना राष्ट्रप्रेमी नागरिक

जळगाव : केंद्र सरकारने ३७० आणि ३५ अ कलम रहित केल्याविषयी समस्त हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने ६ ऑगस्ट या दिवशी यावल येथील श्री विठ्ठल मंदिरात आदर्श पद्धतीने घंटानाद करत संपूर्ण वन्दे मातरम् चे गायन करून विजय दिवस साजरा करण्यात आला. या वेळी धर्माभिमानी श्री. काशीनाथ बारी यांच्या हस्ते भारतमातेच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. तसेच पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला.

हिंदु जनजागृती समितीचे श्री. हर्षद खानविलकर यांनी काश्मीरमधील ३७० आणि ३५ अ ही अन्याय्यकारी कलमे हटवल्याने काय लाभ होणार आहेत ? याविषयी सर्वांचे उद्बोधन केले. या प्रमाणेच पाळधी येथील साई मंदिरातही ६ ऑगस्ट या दिवशी राष्ट्रगीत म्हणून संपूर्ण वन्दे मातरम्चे गायन करण्यात आले. येथे १४ धर्मप्रेमी उपस्थित होते.

या वेळी सौ. निलीमा नेवे, सर्वश्री राजू पाचपांडे, अजय नेवे, गजु सपकाळे, भैय्या चौधरी, राहुल कोळी, उज्वल कानडे, विक्की धोबी, सचिन अडकमोल, केतन चोपडे, प्रशांत फेगडे, देवेंद्र महाजन, चेतन भोईटे यांच्यासह मोठ्या संख्येने राष्ट्रप्रेमी नागरिक उपस्थित होते.

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *