अमेरिकेने सांगितले आणि पाकने ऐकले, असे एकदाही झालेले नाही. त्यामुळे मी मारल्यासारखे करतो, तू रडल्यासारखे कर, असे दोघांमध्ये ठरलेले आहे, असेच वाटते !
वॉशिंग्टन : पाकने भारताविरुद्ध आक्रमक होण्यापेक्षा स्वतःच्या देशातील आतंकवादावर थेट कठोर कारवाई करावी, तसेच भारतात घुसणार्या पाकिस्तानी घुसखोरांना रोखावे, अशी तंबी अमेरिकेने पाकला दिली. अमेरिकन काँग्रेसच्या परराष्ट्र संबंधांवरील तज्ञ समितीने तिची भूमिका प्रसारित केली. भारताने कलम ३७० रहित केल्यापासून पाकचे नेते युद्धाची भाषा करत आहेत. यावरून अमेरिकेने पाकला खडसावले आहे.
अमेरिकेच्या वरिष्ठ आणि कनिष्ठ सभागृहांच्या परराष्ट्र संबंधांवरील समित्यांनी संयुक्तरित्या प्रसारित केलेल्या भूमिकेमध्ये भारतालाही काही गोष्टी सांगण्यात आल्या आहेत. यात म्हटले आहे की, लोकशाहीमध्ये पारदर्शकता आणि राजकीय सहभाग फार महत्त्वाचा आहे. भारत सरकारने जम्मू-काश्मीरमध्ये या गोष्टींचा विचार केला असेल, अशी आम्ही अपेक्षा करतो. भारत जगातील सर्वांत मोठा लोकशाही देश आहे. त्यामुळे सर्वच नागरिकांना महत्त्व मिळणे, त्यांना माहिती मिळणे आणि त्यांच्या अधिकारांचे रक्षण करणे, हे भारताचे दायित्व आहे. (भारत त्याचे दायित्व पार पाडत आहे. त्यात इतरांनी नाक खुपसू नये, असे भारताला वाटते ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात