हिंदु जनजागृती समितीची राष्ट्रध्वजाचा मान राखा चळवळ
अकोला : १५ ऑगस्टला मोठ्या प्रमाणात प्लास्टिकपासून बनवलेले राष्ट्रध्वज बाजारात विक्रीसाठी येतात. विद्यार्थ्यांसह अन्य नागरिकही त्याची मोठ्या प्रमाणात खरेदी करतात. त्यानंतर हेच राष्ट्रध्वज दोन दिवसांनंतर कुठेही पडलेले दिसतात. या प्रकारामुळे राष्ट्रध्वजाचा अवमान होतो. त्यामुळे प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाच्या निर्मितीवर आणि विक्रीवर बंदी घालण्यात यावी, या मागणीसाठी नुकतेच हिंदु जनजागृती समिती आणि अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटना यांच्या वतीने अपर जिल्हाधिकार्यांना निवेदन देण्यात आले. या वेळी अकोला बार असोसिएशनचे उपाध्यक्ष अधिवक्ता राहुल इंगळे, अधिवक्ता राजीव मदनकर, अधिवक्ता अतुल सराग, अधिवक्त्या श्रुती भट आणि हिंदु जनजागृती समितीचे श्री. अजय खोत उपस्थित होते.
वणी (यवतमाळ) येथे नायब तहसीलदारांना निवेदन
वणी (यवतमाळ) : १५ ऑगस्टच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखण्यासाठी प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरणार्यांवर कारवाई करण्यात यावी, असे निवेदन येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने प्रशासनाला देण्यात आले. उपविभागीय अधिकारी यांच्या वतीने नायब तहसीलदार श्री. चपेरिया यांनी हे निवेदन स्वीकारले.