तृणमूूल काँग्रेसच्या हिंदुद्वेषी राजवटीत याहून वेगळे काय घडणार ? हिंदु विद्यार्थ्यांचे सुदैव की, त्यांना अन्य धर्मियांच्या घोषणामुळे काय लाभ होतात?, असे विचारण्यात आले नाही !
कोलकाता : बंगालच्या हुगळी जिल्ह्यातील अकना यूनियन हायस्कूल या सरकारी शाळेच्या इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांच्या एका चाचणी परीक्षेमध्ये वर्तमानपत्रासाठी अहवाल बनवा या उपक्रमांतर्गत काही विषय देण्यात आले होते. त्यात जय श्रीरामच्या घोषणा समाजामध्ये कशा प्रकारे अडथळे निर्माण करत आहेत ? त्याचे दुष्परिणाम काय आहेत ? आणि कट मनी परत देण्यात आल्यावर लोकांना त्याचा काय लाभ होणार आहे ?, असे प्रश्न विचारण्यात आले होते. ही परीक्षा ५ ऑगस्टला झाली. या प्रश्नांची माहिती मिळाल्यावर शाळेच्या अधिकार्यांनी हे विषय रहित केले आणि सर्व विद्यार्थ्यांना यासाठी सरासरी गुण देण्यात येतील, असे सांगितले.
यावर टीका करतांना भाजपने हा प्रश्न जाणीवपूर्वक परीक्षेमध्ये विचारण्यात आला असल्याचा आरोप केला. प्रश्न निवडणार्या संबंधितांवर कारवाई करण्याच्या मागणीसाठी पालकांनी शाळेच्या बाहेर आंदोलन केले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात