कोल्हापूर : ‘कोल्हापूर जिल्ह्यात आलेल्या महापुरात साहाय्य करण्यात विविध संस्था आणि संघटना त्यांच्या परीने कार्यरत आहेत. यात सनातन संस्थेचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, तसेच धर्मप्रेमी, हिंदुत्वनिष्ठ यांनीही मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला आहे. परात्पर गुरु (डॉ.) जयंत आठवले यांच्या कृपाछायेखाली साधना करणार्या साधकांनी आणि धर्मप्रेमींनी या पूरग्रस्तांना साहाय्य करून समाजासमोर आदर्शच निर्माण केला.
सनातनचे साधक दांपत्य काकडे यांच्याकडून साहाय्य
सनातनच्या साधिका सौ. सुरेखा काकडे यांच्याकडे दोन धर्मप्रेमी महिलांनी त्यांचे घर पावसामुळे घर गळत असल्याने साहाय्य मागितले. यावर श्री. आणि सौ. काकडे यांनी त्या दोन्ही महिलांना स्वतःच्या घरी आणून रात्री भोजन दिले. श्री. काकडे यांनी त्यांना पूरग्रस्तांच्या निवार्याच्या ठिकाणी नेऊन सोडले. हा प्रसंग झाल्यावर ‘अशा बिकट स्थितीत आम्हाला साधा चहाही कुणी विचारला नाही; मात्र तुम्ही आमच्यासाठी केलेले साहाय्य शब्दांत न सांगता येणारे होते’, असे त्या दोघींनी डोळ्यांत पाणी आणून सांगितले.
सनातनच्या साधिकांकडून महिलांना साहाय्य
सनातन संस्थेच्या सौ. रूपा पाटील, सौ. घुरके, सौ. चौगुले या साधिकांनी पूरग्रस्तांसाठी रग, स्वेटर, तसेच महिलांसाठी आवश्यक अशा काही गोष्टी एकत्र केल्या आणि त्यांच्या परिसरात पूरग्रस्तांसाठी असलेल्या साहाय्यता केंद्रात नेऊन दिल्या.
उचगाव, तसेच अन्य भागांतील २५० हून अधिक पूरग्रस्तांच्या साहाय्यासाठी सर्व धर्मप्रेमींकडून सूत्रबद्ध नियोजन
आपत्कालीन व्यवस्थापन समिती, उचगावच्या वतीने उचगाव येथील, तसेच अन्य भागांतील २५० हून अधिक पूरग्रस्तांसाठी विविध शाळांमध्ये रहाण्यासाठी सोय, तसेच भोजन, चहा-अल्पाहार यांची सोय करण्यात आली.
यात उचगाव ग्रामपंचायत, बंटीप्रेमी गट, शिवसेना, श्री शिवप्रतिष्ठान, हिंदुस्थान; विविध ज्ञाती संस्था यांसह हिंदु जनजागृती समितीचे श्री. शिवानंद स्वामी सहभागी झाले होते. या कार्यात माजी सरपंच श्री. मधुकर चव्हाण, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष श्री. विनायक हावळ, श्री. सतीश कांबळे, शिवसेना करवीरतालुकाप्रमुख श्री. राजू यादव, माजी उपसरपंच श्री. अनिल शिंदे, युवासेना तालुकाप्रमुख श्री. भाऊ चौगुले, सर्वश्री विक्रम चौगुले, किरटी मसुटे, महेश जाधव, संजय चौगुले, शरद माळी, विराग करी, चंद्रकांत वळकुंजे आदी सहभागी झाले होते. अन्य ठिकाणांपेक्षा या ठिकाणी असलेले नियोजन हे सूत्रबद्ध असल्याने तेथील तलाठ्यांनी सर्वांचे कौतुक केले. सध्या १२ ऑगस्टपर्यंत असे साहाय्य चालू ठेवण्यात येणार आहे.
धर्मप्रेमींनी केलेले साहाय्य अनमोल असल्याचे पूरग्रस्तांनी सांगणे
९ ऑगस्ट या दिवशी हिंदु जनजागृती समितीचे कोल्हापूर जिल्हा समन्वयक श्री. किरण दुसे, श्री. संतोष सणगर, श्री. सागर हंकारे, धर्मप्रेमी श्री. सुकुमार भोजकर, कागल शिवसेना शहरप्रमुख श्री. किरण कुलकर्णी आणि त्यांचा मुलगा कु. शंभु यांनी पूरग्रस्तांना भोजन उपलब्ध करून दिले. या सर्वांनी पट्टणकोडोलीजवळ असलेल्या एका भागातील ३० पूरग्रस्तांना, तर इंगळी (तालुका हातकणंगले) येथील ४० पूरग्रस्तांना भोजनाची पाकिटे दिली. या वेळी पूरग्रस्तांनी ‘आमच्यापर्यंत कोणाचेच साहाय्य पोचवले गेले नाही. थोडेफार साहाय्य बाहेरच्या गावांत केले जात होते. तुम्ही केलेले साहाय्य हे आमच्यासाठी अनमोल आहे’, असे सांगितले.’
पूरग्रस्त स्थितीमध्ये आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच अनुभूती नियतकालिक ‘सनातन प्रभात’साठी तत्परतेने पाठवा !
‘सध्या सांगली, कोल्हापूरसह महाराष्ट्र आणि कर्नाटक राज्यांच्या सीमेवरील काही जिल्ह्यांमध्ये पूरग्रस्त स्थिती आहे. बर्याच ठिकाणी भूस्खलन होऊन दरडी कोसळल्या आहेत. अनेक गावांना जोडणारे रस्ते खचले असल्याने वाहतूक ठप्प झाली आहे. सहस्रो नागरिकांची घरे जलमय झाली आहेत. अनेकांची गुरे-ढोरे पुरात वाहून गेली आहेत. पेट्रोल, डिझेल, दूध आदी जीवनावश्यक वस्तू मिळणेही दुर्लभ झाले आहे. सर्वत्र पाणी पाणी असूनही अनेकांना पिण्याचे पाणी मिळणे मात्र कठीण झाले आहे. या अतीवृष्टीमुळे सर्वत्रचे जनजीवन पूर्णतः विस्कळीत झाले आहे.
‘पूरस्थितीमुळे अन्यत्र स्थलांतरित झालेल्या काही नागरिकांच्या घरांत चोरी होऊन त्यांची संपत्ती लुटली जाणे, तसेच जीवनावश्यक वस्तू चढ्या भावाने विकल्या जाणे, असे कटू अनुभव येत आहेत. बर्याच ठिकाणी हिंदुत्वनिष्ठ संघटना, विविध संप्रदाय, सामाजिक संस्था, तसेच स्वयंसेवी संघटना पूरग्रस्तांसाठी मदतकार्य करत आहेत. सनातन संस्था, तसेच हिंदु जनजागृती समिती सुद्धा पूरग्रस्तांना साहाय्य करत आहेत. अशा प्रतिकूल परिस्थितीत ‘भगवंत आपले रक्षण कसे करतो ?’, याची अनुभूतीही काही जणांना येेत आहे.
या आपत्कालीन परिस्थितीत आपल्याला आलेले चांगले-वाईट अनुभव, तसेच अनुभूती नियतकालिक ‘सनातन प्रभात’ला [email protected] या संगणकीय पत्त्यावर लवकरात लवकर पाठवाव्यात, ही विनंती !’