न्यायालयाने खटला फेटाळल्याने विरोधकांना चपराक
छत्रपती शिवरायांचे नाव घेऊन त्यांचे कार्य प्राणपणाने करणारे पू. भिडेगुरुजी आणि धारकरी यांना त्रास देणार्या विरोधकांचे खरे स्वरूप ओळखा !
मुंबई :अनुमती न घेता व्याख्यान घेतल्याचा ठपका ठेवत काही विरोधकांनी पू. संभाजी भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाच्या विरोधात आयोजकांच्या विरोधात गुन्हा नोंदवून नाहक त्रास देण्याचा प्रयत्न केला. या विरोधात कायदेशीर लढा देऊन श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानने दिलेल्या कायदेशीर लढ्यामध्ये न्यायाधिशांनी या प्रकरणाची सर्व बाजू समजून घेऊन हा खटला फेटाळून लावला. याविषयी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानचे मुंबई प्रमुख श्री. बळवंतराव दळवी यांनी ‘न्यायालयाच्या या निर्णयामुळे विरोधकांना चांगलीच चपराक बसली आहे’, अशी प्रतिक्रिया व्यक्त केली.
श्री. बळवंतराव दळवी पुढे म्हणाले,
१. १६ डिसेंबर २०१८ या दिवशी शिवडी येथे श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने पू. संभाजी भिडेगुरुजी यांचे ‘शिवचरित्र आणि सुवर्ण सिंहासन’ या विषयावर व्याख्यान आयोजित करण्यात आले होते. व्याख्यानाच्या विरोधात काही विरोधकांनी रफी अहमद किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवला.
२. याविषयी श्रीशिवप्रतिष्ठान, हिंदुस्थानच्या वतीने काढण्यात आलेल्या प्रसिद्धीपत्रकात श्री. बळवंतराव दळवी यांनी म्हटले आहे की, काही संघटनांनी पू. भिडेगुरुजी यांच्या व्याख्यानाला विरोध करण्याचा प्रयत्न केला होता. व्याख्यानासाठी मुंबईतील धारकर्यांनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पैसे भरून रितसर अनुमती घेतली होती. बंदिस्त सभागृहात व्याख्यान असल्याने पोलिसांनीही सहकार्य केले होते. या व्याख्यानानंतर ८ मासांनी म्हणजे ऑगस्ट २०१९ मध्ये रफी अहमद किडवाई मार्ग पोलिसांनी धारकर्यांना सांगितले, ‘तुमच्या विरोधात भीम आर्मी, बहुजन रिपब्लिकन सोशालिस्ट पार्टी, भारत एकता मिशन यांनी व्याख्यानाला अनुमती घेतली नसल्याचे सांगून गुन्हा नोंद झाला असल्याचे सांगितले. याविषयी न्यायालय जो दंड आकारेल तो भरून विषय संपवा.’
३. दंडाची रक्कम ५०० रुपये इतकीच होती; मात्र विषय पैशाचा नव्हता, तर खोटा गुन्हा मान्य करण्याचा होता. जे व्याख्यान कायदेशीर मार्गाने रितसर अनुमती घेऊन घेण्यात आले, त्याविरोधात कोणीतरी खोटी तक्रार केली; म्हणून ती का मान्य करावी ? या व्याख्यानाचे निवेदन देण्यासाठी आम्ही रफी अहमत किडवाई मार्ग पोलीस ठाण्यात गेलो असतांना वरिष्ठ पोलीस निरीक्षक बनसोड यांनी तोंडीच सहकार्य करण्याचे आश्वासन दिले होते. धारकर्यांच्या वतीने अधिवक्ता दास यांनी या खटल्याच्या विरोधात न्यायालयात अर्ज केला होता. धर्माच्या बाजूने जो उभा रहातो, विजय त्याचाच होतो. जय शेवटी सत्याचाच होतो.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात