रत्नागिरी : स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री होऊ नये, यासाठी राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने रत्नागिरी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. उदय पेठे यांना ९ ऑगस्ट या दिवशी निवेदन देण्यात आले.
निवेदन देते वेळी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे श्री. देवेंद्र झापडेकर, शिवचरित्र कथाकार श्री. अरविंद बारस्कर, हिंदु राष्ट्र सेनेचे रत्नागिरी अध्यक्ष श्री. सागर कदम, श्री. तेजस साळवी, श्री. अभिषेक खरात, श्री. प्रसाद गवाणे, सनातन संस्थेचे श्री. शशिकांत घाणेकर, हिंदु जनजागृती समितीचे श्री. विष्णु बगाडे आणि श्री. संजय जोशी उपस्थित होते.
१५ ऑगस्ट या दिवशी स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने छोटे राष्ट्रध्वज विकत घेतले जातात. त्यानंतर ते रस्त्यात, कचराकुंडीत अथवा गटारात पडलेले आढळतात. हा राष्ट्रध्वजाचा अवमान आहे. प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची निर्मिती आणि विक्री यांवर शासनाने बंदी घातली आहे.प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री आणि वितरण होऊ नये, यासाठी येथील व्यापारी संघटनेचे अध्यक्ष श्री. उदय पेठे यांना विविध राष्ट्रप्रेमी संघटनांच्या वतीने निवेदन देण्यात आले. या वेळी श्री. उदय पेठे यांनी ‘याविषयी व्यापार्यांसाठी सूचना पत्र काढू’, असे सांगितले.