Menu Close

जळगाव आणि नंदुरबार येथे हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम

प्लास्टिकचे राष्ट्रध्वज वापरू नका, राष्ट्रध्वजाचा मान राखा ! – डॉ. अविनाश ढाकणे, जिल्हाधिकारी, जळगाव

जिल्हाधिकारी (उजवीकडे) यांना निवेदन देतांना समितीचे कार्यकर्ते

जळगाव : १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजांची विक्री करू नये, तसेच त्याची खरेदीही करू नये. राष्ट्रध्वजाचा मान राखणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. राष्ट्रध्वजाचा अवमान केल्यास तो ध्वजसंहितेनुसार दंडनीय अपराध आहे. कोणाला स्वातंत्र्यदिनी अथवा दुसर्‍या दिवशी राष्ट्रध्वज पडलेले आढळल्यास ते गोळा करून त्याचे आदरपूर्वक विसर्जन करावे, असे आवाहन जळगावचे जिल्हाधिकारी डॉ. अविनाश ढाकणे यांनी जळगावच्या नागरिकांना केले. हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेच्या अंतर्गत समितीच्या कार्यकर्त्यांनी निवेदन देण्यासाठी त्यांची भेट घेतली असता हे आवाहन त्यांनी बाईटद्वारे केले.

या वेळी समितीच्या वतीने राबवण्यात येणार्‍या ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेविषयी त्यांना माहिती देण्यात आली. त्यांनी या मोहिमेचे कौतुक केले. तसेच महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ, जिल्ह्यातील सर्व नगर पालिका/परिषदा यांना प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजावर बंदी घालण्यासंदर्भात कारवाई करण्याचे आदेश देण्यात येणार असल्यासंदर्भात आश्‍वस्त केले. या वेळी त्यांना समितीच्या वतीने सिद्ध करण्यात आलेली एक ध्वनीचित्रफीतही दाखवण्यात आली. निवेदन देतांना समितीचे सर्वश्री प्रशांत जुवेकर, श्रेयस पिसोळकर, ब्रह्मा अंकलेकर, हर्षद खानविलकर, गजानन तांबट यांसह अधिवक्ता योगेश पाटील हे उपस्थित होते.

जळगाव पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनाही समितीच्या वतीने निवेदन सादर

जळगाव जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले यांनाही समितीच्या वतीने ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ या मोहिमेच्या अंतर्गत निवेदन देण्यात आले. तसेच प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजासंदर्भात खरेदी-विक्री करणार्‍यांवर कारवाई करण्यात यावी, अशीही मागणी केली. ‘हा उपक्रम अत्यंत स्तुत्य आहे. प्रत्येक भारतीय नागरिकानेच राष्ट्रध्वजाचा अवमान होणार नाही, याची काळजी घ्यायला हवी’, असे मत त्यांनी या वेळी व्यक्त केले.

जळगाव जिल्ह्यातील चोपडा आणि नांद्रा येथेही निवेदन !

जळगाव जिल्ह्यातील चोपडा येथील पोलीस निरीक्षक श्री. लोकरे यांना आणि नांद्रा येथील जिल्हा परिषद मराठी मुलांच्या शाळेच्या मुख्याध्यापकांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रध्वजाचा सन्मान राखण्याविषयी निवेदन देण्यात आले.

नंदुरबार आणि नवापूर पोलीस, प्रशासन आणि शाळा प्रशासन यांना निवेदन सादर

उपजिल्हाधिकारी धनंजय निकम यांना निवेदन देतांना धर्माभिमानी
नवापूर पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत यांना निवेदन देतांना नवापूर येथील धर्माभिमानी

नंदुरबार : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने ‘स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने होणारा राष्ट्रध्वजाचा अवमान रोखा’ याविषयी नंदुरबार उपजिल्हाधिकारी धनंजय निकम आणि नवापूर येथील पोलीस निरीक्षक विजयसिंह राजपूत तसेच तहसीलदार सुनिता जर्‍हाळ यांना निवेदन देण्यात आले. नंदुरबार आणि नवापूर येथील काही शाळांच्या मुख्याध्यापकांनाही निवेदन देण्यात आले.

नंदुरबार येथील स्वामी विवेकानंद विद्यालय, अभिनव विद्यालय, महिला विद्यालय, एकलव्य विद्यालय, डी.आर्. विद्यालय, डॉ. काणे विद्यालय, अध्यापक (डी.एड्.) विद्यालय, यशवंत विद्यालय, श्रॉफ विद्यालय, फार्मसी कॉलेज तसेच नवापूर येथील शिवाजी महाराज हायस्कूल, सार्वजनिक हायस्कूल मराठी आणि गुजराती, वनिता विद्यालय या विद्यालयांच्या प्रमुखांना निवेदन देण्यात आले.

नंदुरबार येथे सर्वश्री मयूर चौधरी, सतीश बागुल, धर्मदास राजपूत, मोरेश्‍वर सोनार, नीलेश पटेल, देवाशीष चव्हाण, तर नवापूर येथे सर्वश्री मुकुंद राजपूत, दुर्गेश राजपूत, विशाल राजपूत, संदीप राजपूत, जितेंद्र अहिरे, राहुल मराठे, जगदीश जयस्वाल, भूषण पाटील, जिग्नेश पाटील, तुषार मराठे अजिंक्य पाटील आदी धर्माभिमानी उपस्थित होते.

 

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *