सामूहिक नामजपप्रसंगी बसलेले सात्त्विक वासरू !
जळगाव : जळगाव तालुक्यातील आवार या गावी हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते श्री. सागर संजय सपकाळे यांच्या घरात गेल्या आठवड्यापासून रात्री सामूहिकरित्या ‘श्रीराम जय राम जय जय राम’ हा नामजप केला जातो. नामजपाच्या वेळी प्रतिदिन हे वासरू साधकांसमवेत येऊन बसते. विशेष म्हणजे ते जमिनीवर विनाआसन बसत नाही, तर गोणपाट किंवा चटई यांवरच बसते. ‘हे वासरू जणूकाही नामजप करत असून ईश्वरभक्तीत मग्न झाले आहे’, असे सर्व उपस्थितांना जाणवते. वासरू दिसायला अतिशय सात्त्विक असून त्याच्याकडे पहातच रहावेसे वाटते.