हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम
नागपूर : प्लास्टिकच्या वापरावर बंदी असूनही १५ ऑगस्ट या दिवशी प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाचा वापर केला जातो. वापर करून झाल्यावर त्याच दिवशी सायंकाळपासून रस्त्यावर, कचर्यात, गटारात आदी ठिकाणी पडून या राष्ट्र्र्रध्वजांची विटंबना होते. त्यामुळे शहरात खुलेपणाने प्लास्टिकच्या राष्ट्रध्वजाची विक्री करणार्यांवर कठोर कारवाई करावी, या मागणीचे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने नागपूर शहरात निवेदन देण्यात आले. उपजिल्हाधिकारी श्री. दीपक कापसे यांनी हे निवेदन स्वीकारले.
यासह प्रतापनगर, नंदनवन, तसेच हुडकेश्वर या पोलीस ठाण्यांमध्ये वरिष्ठ पोलीस निरीक्षकांनाही निवेदन देण्यात आले. या वेळी हुडकेश्वर येथील धर्मशिक्षणवर्गातील महिला आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते उपस्थित होते. विविध शाळांच्या प्रशासकांनाही निवेदने देण्यात आली.