बांगलादेशी लेखिका तसलीमा नसरीन यांचे ट्विट
अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली हिंदूंवर टीका करणारे तसलीमा नसरीन यांच्या अभिव्यक्ती स्वातंत्र्याद्वारे व्यक्त केलेल्या विचारांकडे नेहमीच दुर्लक्ष करतात !
देहली : भारतात अल्पसंख्यांक मुसलमान दंगल आणि बलात्कार करतात, बांगलादेशातील अल्पसंख्यांक हिंदू असा विचारही करू शकत नाहीत, असे ट्विट प्रसिद्ध बांगलादेशी लेखिका तस्लीमा नसरीन यांनी केले आहे.
अन्य एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे की, धार्मिक स्तरावर अल्पसंख्य समुदायाच्या प्रती सहानुभूती ठेवणे, हे धर्मनिरपेक्ष म्हणवून घेण्यासाठी पुरेसे नाही. तुम्ही धर्मनिरपेक्ष व्यक्ती आहात याचा अर्थ असा होतो की, तुमचे कोणत्याही धर्माशी देणेघेणे नाही. (भारतात याच्या उलट असते. भारतात मुसलमान, ख्रिस्ती आदी अल्पसंख्यांकांविषयी सहानुभूती आणि हिंदूंना विरोध, याचा अर्थ धर्मनिरपेक्ष असा होतो ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात)
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात