हिंदु जनजागृती समितीची ‘राष्ट्रध्वजाचा मान राखा’ मोहीम
नाशिक : ‘राष्ट्रध्वजाचा सन्मान राखा’ या हिंदु जनजागृती समितीच्या मोहिमेला जिल्ह्यात उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. अपर जिल्हाधिकारी श्री. नीलेश सागर आणि नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त श्री. राधाकृष्ण गमे यांना निवेदन देण्यात आले. या वेळी त्यांनी समितीच्या कार्याचे कौतुक केले. अपर जिल्हाधिकारी, शिक्षणाधिकारी, २९ शाळा, महाविद्यालये यांसह ४ पोलीस ठाण्यांतही निवेदन देण्यात आले.
रवींद्र विद्या प्रसारक मंडळाचे अध्यक्ष श्री. मनोज पिंगळे यांना निवेदन दिल्यावर त्या वेळी उपस्थित असलेले काँग्रेसचे आमदार श्री. सुधीर तांबे यांनी उपक्रमाचे कौतुक केले. हस्तपत्रके आणि भित्तीपत्रके यांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात आली.