पुस्तकाच्या प्रकाशनाला ब्राह्मण संघटनांचा विरोध
जातीय द्वेष निर्माण करणार्या या पुस्तकावर प्रकाशनपूर्व कायमस्वरूपी बंदी घालून सरकारने जातीय तेढ निर्माण करणारे मुश्रीफ आणि टोळी यांच्यावर कठोर कारवाई करावी. ब्राह्मण समूहाने कोणतेही बॉम्बस्फोट केलेले नाहीत. राष्ट्र आणि धर्म रक्षणाच्या कार्यात ब्राह्मण समाजाचे योगदान मोलाचे आहे; पण तथ्याकडे दुर्लक्ष करत ब्राह्मण आणि हिंदु द्वेषाची कावीळ झालेल्यांच्या मनात विकृतीच येणार ! अशा जातीयवादी पुस्तकाच्या प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे फलक शहरात सर्वत्र लागले असूनही समतेच्या गप्पा मारणारी अंनिस, तसेच अन्य पुरो(अधो)गामी संघटना अन् राजकीय पक्ष अज्ञातवासात गेले आहेत. पुरो(अधो)गाम्यांचे हे मौन जनतेच्या नजरेतून सुटणारे नाही. हे मौनच बरेच काही सांगणारे आहे…
पुणे : ‘हू किल्ड करकरे’ या वादग्रस्त पुस्तकाचे लेखक आणि राज्याचे माजी पोलीस महासंचालक शमशुुद्दीन मुश्रीफ यांनी ‘ब्राह्मनिस्ट बॉम्बड्, मुस्लिम्स हँग्ड’ (ब्राह्मणवाद्यांनी स्फोट केले, मुसलमान लटकले) नावाचे अजून एक ब्राह्मणद्वेष्टे पुस्तक लिहिले आहे. मुश्रीफ यांचा पूर्वेतिहास आणि पुस्तकाचे नाव पहाता ‘हे पुस्तक कपोलकल्पित कथा रचून ब्राह्मण समूहावर विखारी टीका करणारे आहे’, हे स्पष्ट होते. या पुस्तकाच्या प्रकाशनाचा कार्यक्रम १३ ऑगस्ट या दिवशी सायंकाळी ५ वाजता बालगंधर्व रंगमंदिर येथे आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमाला शहरातील ब्राह्मण संघटनांनी विरोध दर्शवला आहे. ‘पुस्तक प्रकाशनावर बंदी घालावी, तसेच जातीयवादी लिखाण करणार्या आणि शहरात पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमाचे अनधिकृत फलक लावणार्या मुश्रीफ यांच्यावर कारवाई करावी’, अशी मागणी परशुराम सेवा संघाच्या वतीने करण्यात आली आहे. संघटनेच्या वतीने ११ ऑगस्ट या दिवशी डेक्कन पोलीस ठाण्यात तक्रार प्रविष्ट करण्यात आली. ‘हा कार्यक्रम रहित केला नाही, तर कार्यकर्ते त्यांचे प्रश्न कार्यक्रमात उपस्थित करतील. त्यातून काही वाद निर्माण झाल्यास त्याचे संपूर्ण दायित्व प्रशासनाचे असेल’, अशी चेतावणीही परशुराम सेवा संघाच्या वतीने देण्यात आली आहे. या वेळी परशुराम सेवा संघाचे प्रदेशाध्यक्ष श्री. विश्वजीत देशपांडे, परशुराम सेवा समितीचे श्री. अविनाश शुक्ल, ‘आम्ही सारे ब्राह्मण’ या पाक्षिकाचे श्री. भालचंद्र कुलकर्णी, सर्वश्री अनिल देवगावकर, तुषार निंबर्गी, गोपाळ कुलकर्णी, चिन्मय गोखले यांच्यासह २५ ते ३० जण उपस्थित होते.
मुश्रीफ यांचे ‘हू किल्ड करकरे’ हे पुस्तकही हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि ब्राह्मण समूहावर अश्लाघ्य टीका करणारे होते. ‘मुंबईवर झालेले २६/११ चे आतंकवादी आक्रमण पाकिस्तानच्या आतंकवाद्यांनी नाही, तर पुण्यातील ब्राह्मणांनी केले होते’, असे मनमानी आरोप या पुस्तकात करण्यात आले होते.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात