Menu Close

बदायूं (उत्तरप्रदेश) येथे धर्मांधांनी कावड यात्रेकरूंवर केलेल्या दगडफेकीत अनेक यात्रेकरू घायाळ

यात्रेकरू डीजे लावून जात असतांना नमाजपठण चालू असल्याने दगडफेक

  • भारतातील तथाकथित पुरोगामी आणि निधर्मीवादी यांना ही असहिष्णुता दिसत नाही का ?
  • दिवसांतून ५ वेळा मशिदींवरून अवैधरित्या भोंगे लावून ध्वनीप्रदूषण करणार्‍यांच्या विरोधात सहिष्णु हिंदूंनी कधीही असे कायदाद्रोही कृत्य केलेले नाही, हे पुरो(अधो)गामी लक्षात घेतील का ?

बदायूं (उत्तरप्रदेश) : हरिद्वार येथून गंगाजल घेऊन परतणार्‍या कावड यात्रेकरूंवर इस्लामनगरच्या बिसौली मार्गावर धर्मांधांनी दगडफेक केली. यात अनेक यात्रेकरू घायाळ झाले. हे यात्रेकरू ट्रॅक्टर ट्रॉलीवरून परतत असतांना ही दगडफेक करण्यात आली. या वेळी धर्मांधांनी पोलिसांवरही दगडफेक केली. पोलिसांनी येथून पलायन केल्याने, तर यात्रेकरूंना २ कि.मी. अंतर ट्रॅक्टर ट्रॉली पळवावी लागल्याने ते वाचले.

यात्रेकरूंनी ट्रॅक्टर ट्रॉलीवर डीजे लावला होता आणि ते येथून जात असतांना येथील इदगाह मैदानात नमाजपठण चालू होते. यामुळे धर्मांधांनी त्यांच्यावर दगडफेक केली. या घटनेनंतर निषेध म्हणून यात्रेकरूंनी रस्ता बंद आंदोलन केले.

संदर्भ : दैनिक सनातन प्रभात

Related News

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *