- २० ते २५ शिवसैनिक आणि शिवभक्त घायाळ
- धर्मांधांना घाबरून यात्रा रहित करण्याची पोलिसांची विनंती
- कावडयात्रा काढण्याचा शिवसेनेचा ठाम निर्धार
हिंगोली : येथे शिवसेनेचे जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी भव्य कावडयात्रेचे आयोजन केले होते. धर्मांधांनी ही कावडयात्रा कळमनुरीकडे जातांना अल्ला हो अकबरच्या घोषणा देत हिंदूंवर तुफान दगडफेक केली; मात्र शिवसैनिकांनी हर हर महादेवचा गजर करत धर्मांधांना प्रत्युत्तर दिले. त्यामुळे त्यांची पळापळ झाली. (शिवसेनाप्रमुखांच्या मुशीतून सिद्ध झालेले शिवसैनिकच प्रतिकूल स्थितीतही धर्मांधांना प्रत्युत्तर देऊ शकतात, यासाठी त्यांचे अभिनंदन ! – संपादक, दैनिक सनातन प्रभात) या वेळी शिवसेनेचे नगरसेवक श्री. श्रीराम बांगर यांसह २० ते २५ शिवसैनिक आणि शिवभक्त घायाळ झाले. शिवसेनेचे खासदार श्री. हेमंत पाटील आणि जिल्हाप्रमुख श्री. संतोष बांगर यांनी शिवसैनिकांना धीर दिला. श्रावण मासाच्या दुसर्या सोमवारी प्रतिवर्षी कावडयात्रा काढली जाते. या यात्रेत मागील वर्षी १० सहस्र शिवसैनिक आणि शिवभक्त सहभागी झाले होते.
१. येथील कयाधु नदीचे पूजन आणि महादेवाची पूजा करून कावडयात्रा घेऊन कळमनुरीकडे जाण्यासाठी शिवसैनिक निघाले होते. बकरी ईदच्या निमित्ताने मुसलमानांची नमाज पढण्याची वेळ संपल्याने त्यानंतरच कावड नेण्याचे शिवसैनिकांनी ठरवले.
२. ईदगाहवर जमलेल्या धर्मांधांच्या जमावाने यात्रेतील घोषणाबाजी आणि गाणी बंद करण्यास सांगितले. त्यानुसार शिवसैनिकांनी ईदगाहपासून काही अंतरापर्यंत गाणे बंद करण्याची सिद्धताही दर्शवली; पण तरीही धर्मांधांनी यात्रेतील हिंदूंवर दगड भिरकावले.
संदर्भ : दैनिक सनातन प्रभात