संभाजीनगर : केंद्रातील भाजप सरकारने जम्मू-काश्मीरमधील कलम ३७० आणि ३५ अ हटवून ऐतिहासिक निर्णय घेतला आहे. कलम रहित करण्यासाठी देशभक्त, नागरिक आणि विविध हिंदुत्वनिष्ठ संघटना यांनी विविध स्तरांवर मागणी केली होती. यासाठी हिंदु जनजागृती समितीच्या वतीने केंद्र सरकारचे अभिनंदन करून घोषणा देत आनंद व्यक्त करण्यात आला.
१. संभाजीनगर येथे श्री खडकेश्वर (महादेव) मंदिरात घंटानादाने आनंद व्यक्त करून सरकारच्या निर्णयाचे स्वागत करण्यात आले. या वेळी शिवसेना नगरसेविका सौ. कीर्ती महेंद्र शिंदे यांनी घंटानाद केला. या वेळी ३५ धर्माभिमानी उपस्थित होते.
२. श्री रामेश्वर महादेव मंदिर आणि श्री सिद्धीविनायक मंदिर येथे केलेल्या घंटानादात प्रत्येकी २५ धर्माभिमानी उपस्थित होते.
३. बजाजनगर (संभाजीनगर) येथील गणपति मंदिर येथे धर्मशिक्षण वर्गातील महिला आणि पुरुष मिळून २१ जणांनी मंदिरामध्ये घंटानाद केला.
जालना
श्री सोमेश्वर महादेव मंदिरात आरतीनंतर घोषणा देऊन सरकारचे अभिनंदन करून हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी सरकारला सद्बुद्धी होवो, अशी प्रार्थना करण्यात आली. या वेळी २२ धर्माभिमानी उपस्थित होते.
अंबड
श्री स्वामी समर्थ मंदिरात घंटानाद करण्यात आला. या वेळी भाजपचे युवा नेता राम शेळके, सरचिटणीस गजानन उंबाळे, तसेच श्री. संतोष खरात आणि प्राध्यापक संतोष ताडे यांसह अन्य हिंदुत्वनिष्ठ उपस्थित होते.