श्रीरामपूर : येथे हिंदु जनजागृती समितीच्या वतीने विविध ठिकाणी निवेदन देऊन जनजागृती करण्यात आली. येथे प्रांत कार्यालय नायब तहसीलदार श्री. तेलोरे यांना निवेदन देण्यात आले. २ महाविद्यालयांमध्ये, तसेच शिरूर येथे ३ शाळा आणि १ ग्रामपंचायत कार्यालय येथे निवेदन देण्यात आले.
संभाजीनगर येथे जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून हिंदु जनजागृती समितीच्या कार्याची प्रशंसा
संभाजीनगर : येथे समितीच्या वतीने जिल्हाधिकारी श्री. उदय चौधरी यांना निवेदन दिले. त्यांनी समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा मोहिमेविषयी जाणून घेऊन कार्याची प्रशंसा केली. जिल्हा पोलीस अधीक्षक सौ. मीना मकवाना यांना निवेदन देतांना समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील महिला उत्स्फूर्तपणे सहभागी झाल्या होत्या. सौ. मकवाना म्हणाल्या, राष्ट्रजागृतीच्या कार्यात मोठ्या संख्येने महिला सहभागी होणे, हे पुष्कळ कौतुकास्पद आहे. याचा मला अभिमान आहे.
संभाजीनगर आणि बजाजनगर परिसर येथील २४ शाळांतील मुख्याध्यापकांना समितीच्या धर्मशिक्षणवर्गातील महिलांनी निवेदन दिले. तेव्हा शाळेतून त्यांना चांगला प्रतिसाद आणि सहकार्य मिळाले. यांसह चिते पिंपळगाव, गोकुळवाडी, लायगाव, खोडेगाव, पिंपळगाव पांढरी, आडूळ, रजापूर, घारेगाव आणि आपतगाव या ग्रामीण भागांतील २३ शाळांमध्ये मोहिमेविषयी माहिती देऊन धर्माभिमान्यांनी निवेदन दिले.