हिंदु जनजागृती समितीच्या राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेविषयी सविस्तर चर्चा
सोलापूर : स्वातंत्र्यदिनानिमित्त येथील स्थानिक वृत्तवाहिनी अस्मिता व्हिजनचे निवेदक श्री. संजय कुलकर्णी यांनी हिंदु जनजागृती समितीचे श्री. दत्तात्रय पिसे आणि कु. वर्षा जेवळे यांची विशेष मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये राष्ट्रध्वजाचे महत्त्व, राष्ट्रध्वजाची होणारी विटंबना कशी रोखावी, हिंदु जनजागृती समिती राष्ट्रध्वजाचा मान राखा या मोहिमेअंतर्गत करत असलेले कार्य अशा विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात आली. या मुलाखतीचे प्रक्षेपण १४ ऑगस्टच्या रात्री ७.३० वाजता आणि १५ ऑगस्टला सकाळी १० वाजता करण्यात येणार आहे, तरी सर्व दर्शकांनी याचा लाभ घ्यावा.