मालाड : हिंदु जनजागृती समितीच्या वतीने राष्ट्रध्वजाचा मान राखा ही मोहीम राबवण्यात आली. याच्या अंतर्गत मालाड येथील घनश्यामदास सराफ महाविद्यालय येथे निवेदन दिले असता महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जयंत आपटे यांनी विद्यार्थिनींसाठी स्वरक्षण प्रशिक्षण शिबिर घेण्याची मागणी केली. यासह त्यांनी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांमध्ये राष्ट्रध्वजाचा अवमान होऊ नये, याविषयी जागृती करणार असल्याचे सांगितले.